India vs Australia Score Updates 1st T20 : एकदिवसीय वर्ल्ड कप संपल्यानंतर टीम इंडिया वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत पुढील पुढील वर्षी होणाऱ्या ‘टी-20’ वर्ल्ड कपची तयारी सुरू केली आहे. ज्याची सुरुवात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला गुरुवारी (23 नोव्हेंबर) झाली.
उभय संघांमधील पहिला सामना विशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला.
भारताचा नवा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने 20 षटकात तीन विकेट गमावत 208 धावा केल्या. टीम इंडियाने 20 षटकांत आठ विकेट गमावत 209 धावा करत सामना जिंकला. रिंकू सिंगने शेवटच्या चेंडूवर षटकार मारत भारताला विजय मिळवून दिला.
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, ऑस्ट्रेलियन संघाने भारताला 209 धावांचे मोठे लक्ष्य दिले आहे. त्याने 20 षटकांत तीन गडी बाद 208 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून जोश इंग्लिशने शानदार शतक झळकावले. त्याने 50 चेंडूत 110 धावा केल्या. या काळात त्याने 11 चौकार आणि आठ षटकार मारले. त्याने स्टीव्ह स्मिथसोबत दुसऱ्या विकेटसाठी 130 धावांची भागीदारीही केली.
स्मिथने 52 धावांची खेळी खेळली. टीम डेव्हिडने नाबाद 19 धावा केल्या. मॅथ्यू शॉर्ट 13 धावा करून बाद झाला. मार्कस स्टॉइनिसने नाबाद सात धावा केल्या. भारताकडून प्रसिध कृष्णा आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
जोश इंग्लिशने त्याच्या आंतरराष्ट्रीय टी-20 कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. त्याने 17व्या षटकात अर्शदीप सिंगच्या चौथ्या चेंडूवर चौकार मारून आपले शतक पूर्ण केले. यानंतर काही वेळातच इंग्लिश पॅव्हेलियनमध्ये परतला.
18व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर प्रसिध कृष्णाने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. इंग्लिश 50 चेंडूत 110 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 11 चौकार आणि आठ षटकार मारले.
ऑस्ट्रेलियाच्या डावातील 10 षटके संपली आहेत. त्याने एका विकेटवर 83 धावा केल्या आहेत. जोश इंग्लिश 25 चेंडूत 44 तर स्टीव्ह स्मिथ 24 चेंडूत नाबाद 24 धावांवर खेळत आहे. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी केली.
8व्या षटकात जोश इंग्लिशने 3 चौकार आणि 1 षटकारासह 19 धावा फटकावताना कृष्णाला चांगलाच धुतला.
पाचव्या षटकात ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला. षटकाच्या चौथ्या चेंडूवर रवी बिश्नोईने मॅथ्यू शॉर्टला क्लीन बोल्ड केले. 11 चेंडूत 13 धावा करून शॉर्ट बाद झाला. ऑस्ट्रेलियाने पाच षटकांत एका विकेटवर 35 धावा केल्या आहेत.
भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा डाव सुरू झाला आहे. मॅथ्यू शॉर्ट अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथसह सलामीला आला आहे. भारताने चार षटकात एकही विकेट न घेता 30 धावा दिल्या आहेत. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने सहा चौकार मारले आहेत.
ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार आणि प्रसिद्ध कृष्णा.
भारताचा नवा कर्णधार सूर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सूर्यकुमारने सांगितले की, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, जितेश शर्मा आणि आवेश खान खेळत नाहीत.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या T20I सामन्यातील नाणेफेक भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता होईल आणि सामन्याचा पहिला चेंडू संध्याकाळी 7.00 वाजता टाकला जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.