India vs Australia World Cup 2023 Final sakal
क्रीडा

Ind Vs Aus Final : असा खेळ करा... वर्ल्ड कप जिंका! आज अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगणार अंतिम सामना

शैलेश नागवेकर : सकाळ वृत्तसेवा

India vs Australia World Cup 2023 Final : साखळी सामन्यांत दणकेबाज आणि धडाकेबाज खेळ केलेला संघ आणि दुसऱ्या बाजूला सुरुवातीला अडखळणारा; पण नंतर सावरत आत्मविश्वास मिळवणारा संघ विजेतेपदाच्या सामन्यात आमने-सामने येतात तेव्हा दोघेही एकाच पातळीवर असतात आणि अशा वेळी क्षमतेअगोदर माईंड गेमची कसोटी पणास लागते. २००३ च्या स्पर्धेत अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताची मानसिकता खच्ची केली, तर २०११ मध्ये धोनीच्या संघाने कणखरता कायम ठेवली आणि निकालांमध्ये फरक ठरला... आता रोहित शर्माच्या संघाला प्रथम याच कसोट्यांवर स्वतःला आजमावावे लागणार आहे.

कसे आहेत ऑस्ट्रेलियन

अशा निर्णायक सामन्यात प्रतिस्पर्ध्यांना संधी न देणे ही ऑस्ट्रेलियाची खासियत; पण नव्या पिढीच्या भारतीय संघाने कसोटी असो किंवा मर्यादित षटकांचे क्रिकेट- ऑस्ट्रेलियाची नांगी वेळोवेळी ठेचली आहे. त्यामुळे त्यांनी कितीही माइंड गेम केला तरी भारतीय संघाला त्यांना वेशीबाहेरच ठेवावे लागेल.

तिघांकडून तरी मोठी खेळी हवी

रोहित-गिल-विराट-श्रेय्यस-सूर्यकुमार अशी भारताची पाच प्रमुख फलंदाजांची फळी आहे. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नामोहरम करण्यासाठी यातील तिघांकडून तरी मोठ्या खेळीची गरज लागणार आहे.

रोहितचा हल्लाबोल कायम हवा

या स्पर्धेत भारतीयांनी वेगळा पॅटर्न तयार केला. मी स्वतःच्या धावांच्या संख्येची पर्वा करणार नाही. सुरुवातीलाच हल्लाबोल करून मार्ग तयार करून देईन, अशी जबाबदारी सेनापती रोहित शर्माने घेतली आणि तो सर्वात पुढे राहून लढत आहे. याच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत रोहित शून्यावर बाद झाला होता. त्यामुळे उद्या रोहितने हल्लाबोलचा पवित्रा कायम ठेवावा; पण थोडीशी सावधगिरी बाळगावी. कारण रोहित जेवढा जास्त मैदानावर राहील, तेव्हढे भारताच्या भल्याचे असेल.

हेझलवूडची नांगी ठेचा

मिचेल स्टार्क, पॅट कमिंस यांच्यापेक्षा जॉश हेझलवूड भारतीयांसाठी नेहमीच डोकेदुखी ठरलेला आहे. पर्थमधील कसोटी सामन्यात ३६ धावांत संघ गारद झाला. त्या वेळीही हेझलवूडने दाणादाण उडवली होती. या वर्ल्डकपमध्ये पहिल्या सामन्यात भारताची ३ बाद २ अशी अवस्था झाली होती. त्यातील तिन्ही विकेट हेझलवूडच्या होत्या. त्यामुळे त्याची नांगी सुरुवातीलाच ठेचावी लागेल.

मधली षटके महत्त्वाची

ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड हे फॉर्मात असलेले फलंदाज आहेत; मात्र स्टीव स्मिथ आणि लाबुशेन यांना ठसा उमटवता आलेला नाही. ऑस्ट्रेलियाने सुरुवात कशीही केली, तरी डावाच्या मध्यावर स्मिथ आणि लाबुशेन यांच्यावर दबाव टाकण्याची जबाबदारी डावाच्या मध्यावर रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांना चोखपणे पार पाडावी लागेल. त्यामुळे ऑस्ट्रेलियन फलंदाजीचा वेसण घलण्याचा आणखी एक पर्याय मिळेल.

गिल आणि अहमदाबादचे मैदान

शुभमन गिल आणि अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडियम यांचे नाते अधिक घट्ट आहे. येथील कसोटी सामन्यांत त्याने भरभरून धावा केल्या आहेत; तसेच आयपीएलही गाजवलेली आहे. गिलला या स्पर्धेत तेवढा प्रभाव पाडता आलेला नसला, तरी आपण बिग मॅच प्लेअर आहोत, हे स्वतःलाच पुन्हा एकदा पटवून द्यायला लागेल.

कोहलीचा विराटरूप कायम हवे

विराट कोहली झपाटल्याप्रमाणे फलंदाजी करत आहेत. मुंबईतील न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात ५० एकदिवसीय शतकांचा मोठा विक्रम केल्यानंतर आता शतकाचे दडपण त्याच्यावर असणार नाही. गेल्या दोन-तीन सामन्यातील धावांचा फॉर्म त्याने उद्या आणखी एकदा कायम राखला, तरी अर्धे दडपण कमी होईल.

मोहम्मद शमी आता एकदाच दे दणका

पहिले चार सामने राखीव खेळाडूत राहिल्यानंतर पंड्या जखमी झाल्यामुळे संधी मिळालेला मोहम्मद शमी आग ओकत आहे. सहा सामन्यातच त्याने २३ विकेट मिळवून आपली दहशत निर्माण केली आहे. त्याला प्रभावहीन ठरवण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघातील कोणी एक फलंदाज त्याची लय बिघडवण्याचा प्रयत्न करेल; पण एखादे षटक खराब गेले, तरी शमीने आत्मविश्वास कमी होऊ देऊ नये. कारण कोणत्याही षटकात कलाटणी देण्याची क्षमता शमीमध्ये आहे.

श्रेयस-राहुलकडून हवी तटबंदी

मुंबईतील सामन्यात विराटवरचे शतकाचे दडपण श्रेयस अय्यरने बेधकडक फलंदाजी करून कमी केले होते. आखूड टप्प्याचे चेंडू हा श्रेयसचा विकपॉईंट अशी बरीच चर्चा घडली; परंतु त्याने तेवढीच शानदार फलंदाजी करून उत्तर दिले असले, तरी आखूड टप्प्याचे चेंडू ही ऑस्ट्रेलियनची खासियत आहे. त्यामुळे श्रेयसला जरा जपून राहावे लागेल. केएल राहुल हा वर्गातील हुशार आणि संयमी मुलाप्रमाणे भूमिका पार पाडत आहे. याच ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलामीला संघ अडचणीत आल्यावर राहुल विराटसह भक्कमपणे उभा राहिला होता. त्या वेळची मानसिकता राहुलला पुन्हा दाखवावी लागेल.

सिराजकडून अचूकता हवी

मोहम्मद सिराज खरे तर एकदिवसीय क्रमवारीत अव्वल असलेला गोलंदाज; परंतु न्यूझीलंडविरुद्ध उपांत्य सामन्यात त्याचा टप्पा भरकटला होता. परिणामी तो खोऱ्याने धावा देत होता. उद्या चेंडू स्विंग किंवा सीम झाला नाही, तरी त्याने यष्टींच्या रोखानेच टप्पा कायम ठेवायला हवा किंवा वेगात बदल करून विविधता आणावी. दुसऱ्या बाजूला बुमराने मोक्याच्या क्षणी विकेट मिळवून पकड मिळवून द्यावी.

मॅक्सवेलला रोखा

ग्लेन मॅक्सवेल ही गाजराच्या पुंगीसारखा आहे. वाजली तर तुफानी वाजली, नाही तर... त्याच्या पट्ट्यात चेंडू टाकता कामा नये. एखादा चुकीचा फटका मारून तो संधी देत असतो, तशी फसवी गोलंदाजी करावी लागेल. तसेच तो स्विप आणि रिव्हर्स स्विपचा अधिक वापर करतो. त्यामुळे त्या दृष्टीने टप्पा आणि क्षेत्ररक्षण रचना करावी लागेल.

झॅम्पाची लय बिघडवा

ॲडम झॅम्पा हा ऑस्ट्रेलियाचा प्रमुख फिरकी गोलंदाज आहे. त्यामुळे त्यांची सर्व मदार त्याच्यावर असेल. रोहित आणि विराट यांना त्याने गुगलीवर अनेकदा बाद केलेले आहे. त्याच्याविरुद्ध ठरवून हल्ला करावा लागेल. यात यश आले की ऑस्ट्रेलियाची फिरकी नामोहरम करता यईल. कदाचित उद्या तो पॉवरप्लेमध्येही गोलंदाजी करू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Mohammad Shami ने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ठोकली दावेदारी; गोलंदाजीनंतर फलंदाजीतही दाखवली चमक

Goa Tourism : जाऊ फुलपाखरांच्या गावा! गोव्यात बटरफ्लाय कंझर्व्हेटरीला नक्की भेट द्या, फि,वेळ आणि ठिकाण जाणून घ्या सर्वकाही

Vinod Tawde : अजित पवारांना सोबत घेतल्याचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्टच सांगितले कारण...

Vinod Tawde: पुन्हा शरद पवार पावसात भिजले; भाजपचे तावडे म्हणाले, हा जिंकण्याचा 'भ्रम'...

SCROLL FOR NEXT