India Vs Australia : मायदेशात वर्ल्डकप विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याच्या आशेने मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने स्पर्धेची विजयी सुरुवात केली आहे. केएल राहुलची उत्कृष्ट खेळी आणि विराट कोहलीसोबतची संस्मरणीय भागीदारी यांच्या जोरावर टीम इंडियाने ६ विकेट्सने विजय मिळवला.
रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांच्या बळावर ऑस्ट्रेलियाचा संघ अवघ्या 199 धावांत गुंडाळला गेला, त्यानंतर टीम इंडियानेही 2 धावांत 3 विकेट गमावल्या. येथून कोहली आणि राहुल यांच्यातील 165 धावांच्या संस्मरणीय भागीदारीने ऑस्ट्रेलियाकडून विजय हिरावून घेत भारताला यशस्वी सुरुवात करून दिली.
विराट कोहली 116 चेंडूत 85 धावा करून बाद झाला. जोश हेझलवूडने त्याला झेलबाद केले. कोहलीने आपल्या खेळीत सहा चौकार मारले. मात्र तो सामना पूर्ण करू शकला नाही आणि त्याचे शतकही हुकले, पण टीम इंडियाला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन तो बाद झाला. आता भारताला विजयासाठी फक्त 33 धावांची गरज आहे.
विराट कोहली आणि लोकेश राहुलच्या शानदार भागीदारीमुळे या सामन्यात भारताची पकड मजबूत झाली आहे. 200 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाने दोन धावांत तीन विकेट गमावल्या. त्यानंतर या दोघांनी भारताची धावसंख्या 140 धावांपर्यंत पोहोचवली. आता दोघेही सहज धावा काढत असून सामन्यावर भारताची पकड मजबूत झाली आहे.
कोहलीनंतर राहुलनेही आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. 28व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर एक धाव घेत त्याने 50 धावा पूर्ण केल्या. राहुल आणि कोहली यांच्यात 100 धावांची भागीदारीही आहे.
विराट कोहलीने 26व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर चौकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले. यासह भारताचे शतकही पूर्ण झाले.
खराब सुरुवात नंतर विराट कोहलीने लोकेश राहुलसह भारतीय डावाची धुरा सांभाळली. दोघांमध्ये 83 चेंडूत अर्धशतकी भागीदारी झाली आहे. आता ही जोडी मोठी भागीदारी करून टीम इंडियाला लक्ष्याच्या जवळ घेऊन जाऊ इच्छित आहे. 16 षटकांनंतर भारताची धावसंख्या 52/3 आहे.
दोन धावांवर भारताची पहिली विकेट पडली आहे. इशान किशन खाते न उघडताच बाद झाला. स्टार्कने त्याला झेलबाद केले.
भारतीय फिरकीपटूंनी कांगारूंच्या फलंदाजांची चांगलीच अडचण केली. रविंद्र जडेजाने 3, कुलदीप यादवने 2 तर अश्विनने 1 विकेट घेत कांगारूंचा निम्मा संंघ गारद केला. यामुळे ऑस्ट्रेलियाला सर्वबाद 199 धावांपर्यंतच मजल मारता आली.
भारतीय फिरकी गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाची अवस्था बिकट केली. रविंद्र जडेजाने मधली फळी गारद केल्यानंतर कुलदीप यादवने कांगारूंचा धोकादायक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलला स्वस्तात माघारी धाडले तर अश्विनने कॅमरून ग्रीनचा अडसर दूर केला.
भारताचा डावखुरा फिरकी गोलंदाज रविंद्र जडेजाने दमदार कामगिरी करत भारताची मधली फळी उडवली. त्याने स्मिथचा त्रिफला उडवल्यानंतर 27 धावा करणाऱ्या लाबुशेनला बाद केले. त्याचबरोबर एलेक्स कॅरीला भोपळाही फोडू दिला नाही.
डेव्हिड वॉर्नरनंतर स्टीव्ह स्मिथ देखील अर्धशतक पूर्ण न करताच बाद झाला. रविंद्र जडेजाने 71 चेंडूत 46 धावा करणाऱ्या स्मिथचा त्रिफळा उडवला.
पॉवर प्लेमध्ये पहिला धक्का बसल्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांनी 69 धावांची भागीदारी रचली होती. मात्र ही जोडी कुलदीप यादवने फोडली. त्याने 41 धावांवर खेळणाऱ्या डेव्हिड वॉर्नरला बाद केले.
पाच धावांवर असतानाच कांगारूंना पहिला धक्का बसल्यानंतर कांगारूंनी सावध फलंदाजी केली. डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांनी 10 षटकात 1 बाद 43 धावांपर्यंत मजल मारली.
जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. त्याने मिचेल मार्शला शुन्यावर बाद केले. विराट कोहलीने स्लीपमध्ये सुंदर कॅच घेत सलामीवीराला माघारी धाडले.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शुभमन गिल आजारी असल्याने त्याच्या ऐवजी इशान किशनला संधी मिळाली आहे. तो रोहितसोबत सलामी देणार हे देखील कर्णधाराने स्पष्ट केलं.
डेंग्यूने आजारी असलेल्या शुभमगन गिल संघासोबत स्टेडियममध्ये पोहचला नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे इशान किशन वर्ल्डकप पदार्पण करणे जवळपास निश्चित आहे. याचबरोबर तो रोहितसोबत सलामीला देखील उतरण्याची शक्यता आहे.
शुभमन गिलला डेंग्यू झाल्याने तो ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्याला मुकण्याची दाट शक्यता होती. मात्र प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी तो खेळू शकणार नाही असं अताच म्हणणे योग्य नाही असे वक्तव्य दिलं होत. त्यामुळे त्याच्या खेळण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.