India Vs Australia WTC Final 2023 Day 1 Session 1 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या दिवशी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ओव्हलची खेळपट्टी फ्रेश होती, खेळपट्टीवर हिरवं गवत पाहून रोहित शर्माने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या दृष्टीने पहिला एक तास हा चांगला होता, बॉल स्विंग होत होता, कागारूंच्या फलंदाजांची भंबेरी उडत होती.
सत्राच्या सुरूवातीला उस्मान ख्वाजाला मोहम्मद सिराजने बाद केले. या विकेटव्यतिरिक्त भारताला दुसरी विकेट मिळवण्यासाठी लंचपर्यंत वाट पहावी लागली. मधल्या काळात संथ सुरूवात करणाऱ्या वॉर्नरने मार्नसच्या साथीने डाव सावरला. अखेर ही जोडी शार्दुलने फोडली मात्र तोपर्यंत दिवसाचे एक सत्र संपले होतो.
पहिल्या एका तासात भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना चांगलेच दमवले. पहिल्या 15 चेंडूवर कांगारूंना एकही धाव घेता आली नाही. त्यात मोहम्मद सिराजने सलामीवीर उस्मान ख्वाजाला शुन्यावर बाद करत कांगारूंची अवस्था 1 बाद 2 धावा केल्या.
भारत आता पहिल्या सत्रावर निर्विवाद वर्चस्व गाजवणार असे वाटत असतानाच सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस लाबुशेन यांनी डाव सावरत पहिला एक तास खेळून काढला. त्यानंतर 15 व्या षटकात वॉर्नरने उमेश यादवला चार चौकार मारत धावगती वाढवली. कांगारूंनी अर्धशतक पार केले.
सेट झालेला डेव्हिड वॉर्नर 43 धावांपर्यंत पोहचला. मार्नससोबतची त्याची भागीदारी 69 धावांपर्यंत पोहचली होती. पहिल्या सत्रावरील नियंत्रण भारत गमावणार असे वाटत असतानाच शार्दुल ठाकूरने सेट झालेल्या डेव्हिड वॉर्नरला बाद करत भारताला लंचपूर्वी मोठा दिलासा दिला. यामुळे लंचसाठी खेळ थांबला त्यावेळी ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 2 बाद 73 अशी झाली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.