India Vs Bangladesh Weather Update esakal
क्रीडा

IND vs BAN : भारत - बांगलादेश सामन्यावेळी ढग दाटणार... पुण्यातील हवामान कसं असणार?

अनिरुद्ध संकपाळ

India Vs Bangladesh Weather Update : आयसीसी वनडे वर्ल्डकप 2023 मधील 18 व्या सामन्यात भारत - बांगलादेश एकमेकांना भिडणार आहेत. हा सामना पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर 19 होणार असून भारतीय संघ विजयाचा चौकार मारण्यासाठी सज्ज असेल. भारताने ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांचा पराभव केला आहे.

दुसरीकडे बांगलादेशने अफगाणिस्तानिरूद्धचा आपला सामना जिंकून आपली वर्ल्डकप मोहीम सुरू केली होती. मात्र त्यांना इंग्लंड आणि न्यूझीलंड विरूद्ध पराभव सहन करावा लागल्यामुळे ते सध्या गुणतालिकेत दोन गुणांसह सातव्या क्रमांकावर आहेत.

बांगलादेश भारताविरूद्धचा सामना जिंकून आपली गाडी विजयीपथावर आणण्यासाठी उत्सुक असतील. बांगलादेशने 2007 च्या वर्ल्डकपमध्ये भारताला पराभवाचा धक्का दिला होता. आताही ते अशाच प्रकारची कामगिरी करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे पुण्याचा सामना रंजक होणार आहे.

कसं असेल पुण्यातील हवामान?

सामन्यादिवशी पुण्यातील वातावरण ढगाळ असण्याची शक्यता आहे. जरी वातावरण ढगाळ असले तरी पाऊस पडण्याची शक्यता फार कमी आहे. वेदर डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार गुरूवारी पुण्यातील कमाल तापमान 34 डिग्री सेल्सियस तर किमान तापमान 23 डिग्री सेल्सियसपर्यंत राहण्याची शक्यता आहे.

वाऱ्याचा वेग हा 11 किलोमीटर प्रती तास राहण्याची शक्यता आहे. तसेच वातावरणात आद्रता देखील असणार आहे. पुण्यात पाऊस पडण्याची शक्यता जवळपास नाहीये. त्यामुळे चाहत्यांना कोणत्याही व्यत्ययाशिवाय सामना पाहण्याचा आनंद लुटता येणार आहे.

भारतीय संघ :

रोहित शर्मा, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, सूर्यकुमार यादव, शार्दुल ठाकूर.

बांगलादेशचा संघ :

लिटन दास, तंजीद हसन, हुसैन शान्तो, मेहदी हसन मिराज, शाकिब अल हसन, मुश्फिकुर रहीम, तौहीद ह्रद्योय, महेदी हसन, तस्कीन अहमद, मुस्तफिजूर रहमान, हसन महमूद, तंजीम हसन साकिब, नसुम अहमद, महमूदुल्लाह.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT