IND vs ENG 3rd Test Umesh Yadav : भारत आणि इंग्लंड यांच्यातील उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी भारताचा संघ नुकताच घोषित झाला. बीसीसीआयच्या निवडसमितीने या तीन कसोटीसाठी 18 जणांचा संघ निवडला असून वेगवान गोलंदाज म्हणून आकाश दीपला संधी देण्यात आली आहे. अजित आगरकरच्या निवडसमितीने संघाची घोषणा करण्यापूर्वी बिहारच्या आकाश दीपची कोणतीच चर्चा सुरू नव्हती. मात्र संघातील त्याच्या निवडलीनंतर सर्वांनी भुवया उंचावल्या.
दरम्यान, भारतीय संघाची घोषणा होताच भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने एक क्रिप्टिक पोस्ट केली. उमेश यादवचे भारतातील ट्रॅक रेकॉर्ड चांगले आहे. तो सध्या रणजी ट्रॉफी खेळत आहे. निवडसमितीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर त्याने एक सूचक पोस्ट केली.
भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर उमेश यादवने इन्स्टाग्रामवर एक क्रिप्टिक पोस्ट लिहीली. उमेशच्या या पोस्टचा संघ निवडीशी संबंध लावला जात आहे. उमेश आपल्या पोस्टमध्ये लिहितो की, 'पुस्तकावर धूळ जमा झाली म्हणून त्यातून गोष्टी संपत नाहीत.' उमेश यादव रणजी ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करतोय. त्यामुळे तो भारतीय संघात पुनरागन करण्याचा दावेदार आहे.
विदर्भच्या 36 वर्षाच्या उमेश यादवने भारताकडून जून 2023 मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला आहे. हा सामना त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळला होता. त्यात उमेशने 2 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर उमेश यादव टीम इंडियाच्या बाहेर आहे. उमेश यादव संघात पुनरागमन करण्यासाठी जोरदार प्रयत्न करतोय. त्याने रणजी ट्रॉफीत चांगली कामगिरी केली आहे. मात्र निवडसमितीने त्याच्याकडे दुर्लक्षच केलं आहे.
उमेश यादव रणजी ट्रॉफीत विदर्भकडून खेळतोय. त्याने रणजी ट्रॉफीत आतापर्यंत 4 सामन्यात 19 विकेट्स घेतल्या आहेत. उमेश यादवने 32 सामन्यात 25.88 च्या सरासरीने 101 विकेट्स घेतल्या आहेत. भारतीय खेळपट्ट्यांवर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याने 11 सामन्यात 18.25 च्या सरासरीने 43 विकेट्स घेतल्या आहेत. भारतीय खेळपट्ट्यांवर त्याच्या इतक्या विकेट्स कोणी घेतलेल्या नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.