India vs England T20 World Cup 2022 sakal
क्रीडा

T20 World Cup : टीम इंडियाचा उपांत्य फेरीत इंग्लंडवर विजय निश्चित! कारण...

Kiran Mahanavar

India vs England T20 World Cup 2022 : टीम इंडिया टी-20 विश्वचषक 2022 ट्रॉफी जिंकण्यापासून फक्त दोन पावले दूर आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 विश्वचषक 2022 चा दुसरा उपांत्य सामना गुरुवारी 10 नोव्हेंबर रोजी अॅडलेड ओव्हलवर खेळवला जाणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताला विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.

इंग्लंड संघाचा या शानदार सामन्यात टीम इंडियाने पराभव केला तर अंतिम फेरीत प्रवेश निश्चित होईल. टीम इंडिया आता ज्या फॉर्ममध्ये आहे ते पाहता यावेळी टी-20 विश्वचषक 2022 ची ट्रॉफी त्याच्यापासून फार लांब नाही. असे झाल्यास भारत 15 वर्षांनंतर टी-20 विश्वचषक ट्रॉफी जिंकेल. यापूर्वी 2007 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने टी-20 विश्वचषक जिंकला होता.

टीम इंडियाला उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्धच्या विजयासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय रेकॉर्डबद्दल बोलायचे झाले तर, भारताचा इंग्लंडविरुद्धचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 आंतरराष्ट्रीय फॉर्मेटमध्ये आतापर्यंत 22 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी 12 सामने टीम इंडियाने जिंकले आहेत, तर 10 सामने इंग्लंड संघाने जिंकले आहेत.

टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी टीम इंडियाने 2 सामने जिंकले आहेत तर इंग्लंडने 1 सामना जिंकला आहे. 2012 मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 विश्वचषकात शेवटचा सामना खेळला गेला होता. श्रीलंकेत खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने इंग्लंडचा 90 धावांनी पराभव केला होता. 2007 मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 विश्वचषकातील पहिला सामना खेळला गेला होता. या सामन्यात टीम इंडियाने 18 धावांनी विजय मिळवला. हा तोच सामना आहे, ज्यात टीम इंडियाचा माजी क्रिकेटर युवराज सिंगने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या 6 चेंडूत 6 षटकार ठोकले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba siddiqui murder case: बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडल्यानंतरही 'त्याचं' समाधान झालं नव्हतं; चक्क लीलावतीमध्ये...

Nagpur Accident: काॅंग्रेस नेते नितीन राऊत अपघातात बालंबाल बचावले, कारला ट्रकने धडक दिली अन्....

Mumbai Crime: गोराई बीचवरील हत्येचा उलगडा; मृतदेहाचे केले होते सात तुकडे, हातावरील टॅटूमुळे पटली ओळख

Children's Day Special Recipe: बालदिनानिमित्त मुलांसाठी बनवा चवदार रोटी पिझ्झा, सोपी आहे रेसिपी

Mumbai Police : बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी; रायचूरमधून गीतकाराला अटक

SCROLL FOR NEXT