क्रीडा

IND vs ENG Playing 11 : लखनौची खेळपट्टी आहे तरी कशी ... प्लेईंग 11 निवडताना रोहितला द्यावा लागणार शामीचा बळी?

अनिरुद्ध संकपाळ

IND vs ENG Playing 11 : वनडे वर्ल्डकप 2024 मधील आपले पाचही सामने जिंकून यजमान भारताने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. मात्र आता राऊंड रॉबिन फेरीच्या दुसऱ्या हाफमध्ये भारताला कडव आव्हान मिळणार आहे. त्यातील पहिला सामना हा रविवारी 29 ऑक्टोबरला गतविजेत्या इंग्लंडसोबत होणार आहे.

हा सामना लखनौच्या भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर होणार आहे. लखनौची खेळपट्टी ही फलंदाजांसाठी कायम आव्हानात्मक असते. इथे फिरकीपटूंचा राज्य असतं. मात्र यावेळेची लखनौची खेळपट्टी ही रोहितला आवडते तशी कोरडी असणार नाही. त्यामुळे या सामन्यात रविचंद्रन अश्विन की शार्दुल ठाकूर कोणाला खेळवायचं हा मोठा प्रश्न त्याच्यासमोर असणार आहे.

हार्दिक पांड्या अजून घोट्याच्या दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळे भारताला फलंदाजी आणि गोलंदाजीमधील त्याची उणीव भरून काढण्यासाठी दोन खेळाडूंची गरज लागणार आहे. मोहम्मद शामीने दमदार पुनरागमन करत न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात 5 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे त्याची प्लेईंग 11 मधील जागा पक्की आहे. हार्दिक पांड्या नसल्यामुळे फलंदाजीतील खड्डा भरून काढण्यासाठी सूर्यकुमार यादवला संघात संधी मिळाली होती.

मात्र लखनौची खेळपट्टी हा कळीचा मुद्दा आहे. या खेळपट्टीवर जर फिरकीला साथ मिळणार असेल तर संघात एक अतिरिक्त फिरकीपटू असणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत रविचंद्रन अश्विनला संधी मिळू शकते. सध्या तरी या खेळपट्टीवर फिरकीपटूंनी जास्त मदत मिळेल असे संकेत मिळालेले नाहीत. ही खेळपट्टी पूर्णपणे कोरडी आणि पूर्णपणे गवत असलेली नाही. त्यामुळे रोहित आणि राहुल यांना निर्णय घेण्यात अडचण येऊ शकते.

कसं असेल बॉलिंग कॉम्बिनेशन?

- न्यूझीलंड विरूद्धच्या सामन्यात पाच विकेट्स घेतल्यामुळे मोहम्मद शामी प्लेईंग 11 मध्ये खेळेल.

- रोहित शर्मा सध्या तरी बुमराह-शमी-सिराज हे वेगवान कॉम्बिनेशन कायम ठेवेल.

- त्यामुळे जरी अतिरिक्त फिरकीपटू खेळवायचं असलं तरी अश्विनला संधी मिळेल असं काही वाटत नाही.

- रोहित शर्माला जर अश्विनला खेळवायचं असेल तर सूर्यकुमार यादव किंवा मोहम्मद सिराजला वगळावं लागेल.

- अजून एक पर्याय म्हणजे तीनही वेगवान गोलंदाजांना खेळवले तर सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, विराट कोहली आणि रोहित शर्माला इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात किमान एक षटक गोलंदाजी करावी लागेल.

फलंदाजी विभागात सहसा कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. पहिले पाच फलंदाज कायम राहतील. गिल आणि रोहित सलामी देतील. त्यानंतर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल. तो त्याच्या 49 व्या वनडे शतकासाठी प्रयत्न करेल. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि केएल राहुल अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येतील. जर सूर्या संघातील जागा टिकवू शकला तर तो सहाव्या आणि रविंद्र जडेजा सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येईल.

भारताची इंग्लंडविरूद्धची संभाव्य प्लेईंग 11

  • रोहित शर्मा

  • शुबमन गिल

  • विराट कोहली

  • श्रेयस अय्यर

  • केएल राहुल

  • सूर्यकुमार यादव

  • रविंद्र जडेजा

  • कुलदीप यादव

  • जसप्रीत बुमराह

  • मोहम्मद शामी

  • मोहम्मद सिराज

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT