Ire vs Ind sakal
क्रीडा

Ire vs Ind: सामन्यापूर्वी कर्णधार हार्दिकने दिले संकेत; जबाबदारी घेणे मनापासून...

पहिली टी-२० : भारत आणि आयर्लंड मालिकेला आजपासून सुरुवात

Kiran Mahanavar

India vs Ireland T-20 Series: आयर्लंडविरुद्धच्या दोन टी-२० सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज होत आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पूर्णतः सज्ज झाला आहे. हा संघ दिसायला नवा असला, तरी आमची गुणवत्ता सर्वांनाच माहीत आहे. भारतीय क्रिकेटकडे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत ही सर्वांत मोठी जमेची बाजू आहे. हे नवे खेळाडू उंबरठा पार करून भारतीय संघात स्थान मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हीच माझ्या दृष्टीने मोठी गोष्ट आहे, असे हार्दिक पांड्याने ‘सकाळी’शी बोलताना सांगितले.

बदललेल्या हवामानात खेळण्याच्या आव्हानाबद्दल बोलताना हार्दिक हसत-हसत म्हणाला, आम्ही ज्या हवामानात नुकतेच खेळून आलो त्यापेक्षा थंडी जास्त आहे. खास करून डब्लिनला वारे वाहू लागले की, हवा बदलते. सगळ्या खेळाडूंना बदलत्या हवामानाची समज आहे. तेच आव्हान आहे जे पेलायला संघ तयार आहे. मी शेवटी म्हणेन, की बाकीचे काहीही बदलले तरी क्रिकेट तेच राहते... बॅट-बॉलमधील युद्ध तेच राहते.

पहिल्यांदा भारतीय संघाचे नेतृत्व करायला मिळत असल्याने हार्दिक खूश दिसला. जबाबदारी घेणे मला पहिल्यापासून खूप आवडते. कप्तानी करताना जबाबदारी थोडी जास्त असते इतकाच फरक आहे. जेव्हा आव्हान मोठे असते आणि संघाची जबाबदारी माझ्यावर असते तेव्हा मला चांगला खेळ करायची जास्त ऊर्जा मिळते, असे कर्णधार पदाबाबत हार्दिक म्हणाला.

आयर्लंड संघाला कमकुवत लेखण्याची चूक भारतीय संघ करणार नसल्याचे कप्तान पांड्या आणि प्रशिक्षक लक्ष्मणने स्पष्ट केले. भारतीय संघाची जर्सी घालून खेळताना प्रत्येक सामना तितकाच मोलाचा असतो. आपण कोणत्या संघाविरुद्ध खेळतो आहोत यापेक्षा प्रत्येक वेळा मैदानात उतरल्यावर १०० टक्के प्रयत्न करून सर्वोत्तम खेळ कसा करता येईल याचा विचार आम्ही एकत्रित करतो आहोत. अशी भारताची भूमिका हार्दिकने यावेळी बोलून दाखवली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT