क्रीडा

IND vs NZ 2nd T20: भारताने न्यूझीलंडचा 6 विकेट्स केला पराभव! मालिका 1-1 अशी बरोबरीत

Kiran Mahanavar

India vs New Zealand 2nd T20 Live Cricket Score : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज लखनौच्या एकना स्टेडियमवर खेळल्या जात आहे. न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि न्यूझीलंडचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून 99 धावाच करू शकला. भारताने 100 धावांचे लक्ष्य एका चेंडू राखून पूर्ण केले. दुसरा सामना सहा विकेटने जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.

भारताला तिसरा धक्का

ड्रिंक्स ब्रेकनंतर 11व्या षटकात भारताला तिसरा धक्का बसला. ईश सोधीने राहुल त्रिपाठीला झेलबाद केले. त्याला 18 चेंडूत 13 धावा करता आल्या. भारताची धावसंख्या 11 षटकांनंतर 3 बाद 51 अशी आहे. भारताला विजयासाठी अजूनही 54 चेंडूत 49 धावांची गरज आहे.

भारताला दुसरा धक्का

46 धावांच्या स्कोअरवर भारताला दुसरा धक्का बसला. इशान किशन धावबाद झाला. त्याला 32 चेंडूत 19 धावा करता आल्या.

भारताला पहिला धक्का

भारताला पहिला धक्का चौथ्या षटकात 17 धावांवर बसला. तो नऊ चेंडूत 11 धावा करून बाद झाला. त्याने या खेळीत दोन चौकार मारले. चार षटकांनंतर भारताची धावसंख्या एका विकेटवर १७ धावा आहे.

फिरकीपटू पुढे न्यूझीलंडने टाकल्या नांग्या! टीम इंडियाला जिंकण्यासाठी 100 धावांचे लक्ष्य

लखनौच्या एकना स्टेडियमवर न्यूझीलंडने भारतासमोर 100 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. किवी संघाने 20 षटकांत आठ गडी गमावून 99 धावा केल्या. भारतीय फिरकीपटूंसमोर न्यूझीलंडचे फलंदाज हतबल दिसत होते. फिरकीपटूंनी एकूण चार विकेट घेतल्या. फिरकीपटू युजवेंद्र चहलनेही भारतासाठी विकेटचे खाते उघडले. त्याने फिन ऍलनला क्लीन बोल्ड केले.

यानंतर वॉशिंग्टन सुंदरने डेव्हॉन कॉनवेला झेलबाद केले. दीपक हुड्डाने ग्लेन फिलिप्सला बाद करत न्यूझीलंडला तिसरा धक्का दिला. यानंतर कुलदीप यादवने डॅरिल मिशेलला क्लीन बोल्ड केले.

अर्शदीपने 18व्या षटकात दोन विकेट घेतल्या. कर्णधार मिचेल सँटनर 19 धावांवर नाबाद राहिला आणि जेकब डफीने सहा धावा केल्या. भारताकडून अर्शदीपने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर चहल, कुलदीप, हुड्डा, सुंदर आणि हार्दिक यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

टीम इंडियाने न्यूझीलंडला दिला पहिला धक्का

चहलने भारताला पहिले यश मिळवून दिले आहे. चौथ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने फिन अॅलनला बोल्ड केले.

सलामीवीर ऍलन आणि कॉनवे क्रीजवर

न्यूझीलंडचे सलामीवीर फिन ऍलन आणि डेव्हॉन कॉनवे मैदानात आहेत. गेल्या सामन्यात दोघांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. या सामन्यातही त्याच्याकडून तशीच अपेक्षा असेल. भारताकडून पहिल्याच षटकात हार्दिक पांड्या गोलंदाजी करायला आला. पहिल्या षटकात त्याने सहा धावा खर्च केल्या.

टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये मोठा बदल

इशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग.

न्यूझीलंडने जिंकले नाणेफेक! करो किंवा मरो सामन्यात घेतला मोठा निर्णय

न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. किवी संघाने कोणताही बदल केला नाही. भारतीय संघ एका बदलासह मैदानात उतरला आहे. उमरान मलिकच्या जागी युझवेंद्र चहलला संधी मिळाली आहे.

India vs New Zealand 2nd T20 Live Cricket Score : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज लखनौच्या एकना स्टेडियमवर खेळल्या जात आहे. न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि न्यूझीलंडचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून 99 धावाच करू शकला. भारताने 100 धावांचे लक्ष्य एका चेंडू राखून पूर्ण केले. दुसरा सामना सहा विकेटने जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

"Fake Narrative फार काळ टिकत नाही"; पंतप्रधान मोदींनी केलं विक्रांत मेस्सीच्या द साबरमती रिपोर्टचं कौतुक

Vikramgad Assembly constituency 2024 : स्थलांतरीत मजुरांमुळे मतदानाची टक्केवारी घटण्याची शक्यता, उमेदवारांपुढे आव्हान.

Sharad Pawar: बारामतीत शरद पवारांच्या सभेपूर्वी नाट्यमय घडामोडी, प्रतिभा पवारांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून अडवले, पहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT