mayank agarwal cheteshwar pujara esakal
क्रीडा

IND vs NZ : भारताच्या दिवसअखेर बिनबाद 69 धावा

पुजारा - मयांकची दुसऱ्या डावात अर्धशतकी सलामी

अनिरुद्ध संकपाळ

मुंबई : न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने मजबूत पकड मिळवली आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजी करणाऱ्या भारताने ३२५ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर न्यूझीलंडला पहिल्या डावत ६२ धावात गुंडाळले. मात्र त्यांना फॉलोऑन न देता भारताने पुन्हा फलंदाजी करण्यास सुरुवात केली. भारताने दुसऱ्या दिवसअखेर बिनबाद ६९ धावा केल्या. सलामीवीर मयांक अग्रवाल ३८ धावांवर तर चेतेश्वर पुजारा २९ धावांवर नाबाद आहे.

भारतीय संघाचा पहिला डाव 325 धावांत आटोपल्यानंतर न्यूझीलंडने आपला पहिला डाव सुरु केला. दोन तासांच्या आताच टीम इंडियाने न्यूझीलंडचा खेळ खल्लास केला. अश्विनने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. मोहम्मद सिराजने 3, अक्षर पटेलनं दोन तर जयंत यादवने एक विकेट मिळाली.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ( INDvsNZ 2nd Test day 2 ) डावखुऱ्या एजाज पटेलने ( Ajaz Patel ) एकट्याने भारताचा संपूर्ण डाव ३२५ धावात संपवला. एजाज पटेलने ११९ धावा देत भारताचे १० च्या १० फलंदाजांना बाद केले. एजाज पटेल ( Ajaz Patel ) आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका डावात १० च्या १० विकेट घेणाऱ्या अनिल कुंबळे आणि जीम लॅकर यांच्या पंक्तीत जाऊन बसला. भारताकडून मयांक अग्रवालने १५० धावांची दमदार खेळी करत भारतातील धावसंख्येच्या जवळपास निम्मा वाटा एकट्याने उचलला. त्याला अक्षर पटेलने ( Axar Patel ) ५२ धावांची अर्धशतकी खेळी करत चांगली साथ दिली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी रचली. पहिल्या दिवसअखेर २५ धावा करुन नाबाद असणारा वृद्धीमान सहा ( Wriddhiman Saha ) दुसऱ्या दिवशी दोन धावांची भर घालून परतला. सहाला बाद करत एजाज पटेलने आपल्या पाच विकेट पूर्ण केल्या. त्यानंतर आलेल्या आर. अश्विनचा ( R Ashwin ) पहिल्याच चेंडूवर त्रिफळा उडवत भारताचा सहावा फलंदाज पॅव्हेलियनमध्ये धाडला. ( INDvsNZ 2nd Test Live Update )

दिवसअखेर मयांक ३८ तर चेतेश्वर पुजारा २९ धावांवर नाबाद

मयांक अग्रवाल चेतेश्वर पुजाराने दिवस अखेर पर्यंत भारताला ६९ धावांपर्यंत पोहचवले.

पुजाराचा आक्रमक अवतार, मयांकबरोबर दुसऱ्या डावात नाबाद अर्धशतकी सलामी

भारताचा फॉलोऑन न देण्याचा निर्णय, जायबंदी शुभमन गिलच्या ऐवजी चेतेश्वर पुजारा सलामीला

अक्षर पटेलने १८ धावा करणाऱ्या कायल जेमिसनला बाद केले न्यूझीलंडला पहिला डाव ६२ धावात संपुष्टात

अश्विनने सोमरविलेला शुन्यावर बाद करत न्यूझीलंडला दिला नववा धक्का

एजाजच्या विक्रमी कामगिरीनंतर टीम इंडियाच्या गोलंदाजीसमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी गुडघे टेकले आहेत. न्यूझीलंडने आठ विकेट गमावल्या असून त्यांच्यावर फॉलोऑनचे संकट ओढावण्याची भीती निर्माण झालीये.

53-8 : अश्विनने साउदीला दाखवला तंबूचा रस्ता, त्याला खातेही उघडता आले नाही.

53-7 : टॉम ब्लंडेलच्या रुपात न्यूझीलंडने आणखी एक विकेट गमावली, अश्विनने त्याला 8 धावांवर बाद केले.

38-6 : जड्डूच्या जागी संधी मिळालेल्या जयंत यादवला मिळाले यश, रचिन रविंद्र 4 धावांवर कोहलीकडे कॅच देऊन तंबूत

31-5 : रविचंद्रन अश्विनने हेन्री निकोलसला धाडले माघारी, न्यूझीलंडचा अर्धा संघ तंबूत

27-4 सिराजनंतर अक्षर पटेलच्या फिरकीची जादू. त्याने डॅरेल मिशेलला अवघ्या 8 धावांवर केलं पायचित

भारतीय संघाच्या गोलंदाजांची दमदार सुरुवात, सिराजने न्यूझीलंडला दिले धक्यावर धक्के

17-3 : रॉस टेलर खाते उघडेपर्यंत थांबला, त्यानंतर सिराजने त्याला बोल्ड काढला

15-2 : टॉम लॅथमही स्वस्तात माघारी, सिराजच्या खात्यात दुसरे यश

10-1 : विल यंग अवघ्या 4 धावा करुन माघारी, सिराजच्या गोलंदाजीवर विराटने घेतला कॅच

भारतीय संघाचा पहिला डाव सर्व बाद 325; न्यूझीलंडनं आपल्या पहिल्या डावाला केली सुरुवात

एजाज पटेलने भारताला पाठोपाठ दोन धक्के दिल्यानंतर शतकवीर मयांक अग्रवालने ( Mayank Agarwal ) अक्षर पटेलला साथीला घेत डाव सावरण्यास सुरुवात केली. या दोघांनी भारताला २५० चा टप्पा पार करुन दिला. या दोघांनी सातव्या विकेटसाठी नाबाद ६१ धावांची भागीदारी करत भारताला लंचपर्यंत २८५ धावांपर्यंत पोहचवले. दरम्यान, मयांक अग्रवालही आपल्या दीडशतकाजवळ पोहचला होता.

लंचनंतर मयांकने आपले दीडशतक पूर्ण केले. अक्षर पटेलनेही आपले अर्धशतक पूर्ण केले होते. मात्र एका बाजूने सातत्याने भारताला धक्के देणाऱ्या एजाज पटेलने मयांकला बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर एजाज पटेलने अक्षर पटेलला बाद करत अनिल कुंबळेचा विक्रम आपल्या टप्प्यात आणला.

पटेलने १२ धावा करणाऱ्या जयंत यादवला बाद करत आपला नववा बळी टिपला. त्यानंतर ४ धावांवर मोहम्मद सिराजला बाद करत विश्वविक्रमाशी बरोबरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे यांच्या पराभवाची ५ कारणं; दोघांचं भांडण, महेश सावंतांचा लाभ

Parag Shah Won in Ghatkopar East Assembly Election: घाटकोपर पूर्व मतदार संघावर भाजपचा झेंडा कायम; पराग शाहांचा मोठ्या फरकाने विजय

Siddharth Shirole Shivajinagar Election 2024 Result: शिवाजीनगरात काँग्रेसला बंडखोरीचा फटका, सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी

Assembly Election Result Viral Memes : महायुतीचा एकतर्फी विजय अन् महाविकास आघाडीचा सपशेल पराभव; सोशल मीडियावर आली Memes ची लाट

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: माळशिरसात सातपुते २०७५ मतांनी पिछाडीवर

SCROLL FOR NEXT