IND vs NZ 3rd ODI Wasim Jaffer Sanju Samson esakal
क्रीडा

NZ Vs IND 3rd ODI : भारताची Playing 11! जाफरने सांगितले संजूला न खेळवण्याचे कारण

अनिरुद्ध संकपाळ

IND vs NZ 3rd ODI Wasim Jaffer Sanju Samson : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा तिसरा सामना उद्या ख्राईस्टचर्च येथे खेळवला जात आहे. मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी भारताला या सामन्यात विजय मिळवणे गरजेचे आहे. पहिल्या सामन्यात भारताचा 306 धावा करून देखील पराभव झाला होता. न्यूझीलंडने हे आव्हान 3 फलंदाजांच्या मोबदल्यातच पार केले होते. दरम्यान, तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात भारताची प्लेईंग 11 काय असेल याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. पावसामुळे रद्द झालेल्या दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात बदल करण्यात आले होते. संजू सॅमसनला एकच संधी देऊन त्याला प्लेईंग 11 मधून पुन्हा एकदा डच्चू देण्यात आला. आता तिसऱ्या सामन्यात भारतीय संघव्यवस्थापनाची काय रणनिती असेल याबाबत भारताचा माजी सलामीवीर वसिम जाफरने आपले मत व्यक्त केले.

न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या भारताच्या संघाचा उपकर्णधार ऋषभ पंत सातत्याने फेल जात आहे. तरी देखील त्याला संधी मिळते मात्र फॉर्ममध्ये असलेल्या संजू सॅमसनला मात्र एक दोन सामने खेळवून पुन्हा बेंचवर बसवण्यात येत आहे. आता तिसऱ्या वनडे सामन्यात तरी त्याला अंतिम 11 च्या संघात स्थान मिळणार की नाही याबाबत लोकांच्या मनात प्रश्न उपस्थित झाले आहेत. याबाबत भारताचा माजी सलामीवर वसिम जाफरने संजू सॅमसनला मालिकेतील शेवटच्या सामन्यात देखील संधी मिळण्याची शक्यात कमी असल्याचे सांगितले.

वसिम जाफर म्हणाला की, 'तुम्हाला सर्वांना संजू सॅमसन प्लेईंग 11 मध्ये असावा असे वाटते. मात्र मी पुन्हा हे सांगू इच्छितो की जर संघ व्यवस्थापन 6 गोलंदाजीचे पर्याय घेऊन मैदानात उतरावे असा विचार करत असेल तर संजू सॅमसनला संघात स्थान मिळणे कठिण आहे. या कराणामुळेच सहाव्या गोलंदाजाचा विचार झाला तर दीपक हुड्डाकडे पाहिले जाते. जर फलंदाज खेळवायचा म्हटलं की मग संजू सॅमसन हा एक उत्तम पर्याय आहे.'

पहिल्या वनडे सामन्यात संजू सॅमसनने 38 चेंडूत 36 धावांची खेळी केली होती. मात्र दुसऱ्या वनडे सामन्यात त्याला संघातून वगळण्यात आले. यावेळी कर्णधार धवनने सहावा गोलंदाजीचा पर्याय लक्षात घेऊन सॅमसनला अंतिम 11 च्या संघात स्थान देण्यात आलेले नाही असे सांगितले.

तिसऱ्या वनडे सामन्यासाठी भारताची Playing 11

शिखर धवन, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, दीपक हुड्डा, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चाहर, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल

हेही वाचा : दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT