Ind Vs Pak Asia Cup 2022 
क्रीडा

Ind vs Pak Asia Cup 2022 : आशिया चषकमध्ये पुन्हा भिडणार भारत-पाक; जाणून घ्या कसे

चाहत्यांना रोमहर्षक सामना पाहायला मिळाला, कारण बऱ्याच दिवसांनी भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने आले होते. मात्र आता पुन्हा टक्कर पाहण्यासाठी चाहत्यांना फार काळ थांबावे लागणार नाही. जाणून घ्या कसे

Kiran Mahanavar

Ind vs Pak Asia Cup 2022 : टीम इंडियाने आशिया कप 2022 मध्ये आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात केली. दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर रविवारी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 5 विकेट राखून पराभव केला. पाकिस्तानविरुद्धच्या विजयात हार्दिक पांड्याने केलेल्या शानदार कामगिरीबद्दल त्याला सामनावीराचा किताब देण्यात आला. यादरम्यान चाहत्यांना रोमहर्षक सामना पाहायला मिळाला, कारण बऱ्याच दिवसांनी भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने आले होते. मात्र आता पुन्हा टक्कर पाहण्यासाठी चाहत्यांना फार काळ थांबावे लागणार नाही. कारण या आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होऊ शकतो. जाणून घ्या कसे...

आशिया चषक स्पर्धेचे पॉइंट टेबल आता काय आहे?

आशिया चषक स्पर्धेत एकूण 6 संघ खेळत असून 3-3 अशा दोन गटात विभागले गेले आहेत. भारत, पाकिस्तान आणि हाँगकाँग अ गटात आहेत. तर अफगाणिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश ब गटात आहेत.

अ गटात - भारत सध्या नंबर-1, पाकिस्तान नंबर-2 आणि हाँगकाँग तीन वर आहे.

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना हाँगकाँगशी सामना आजून बाकी आहे, जर दोन्ही संघांनी आपला सामना जिंकला तर पॉइंट टेबलचे चित्र स्पष्ट होईल, त्यात भारत पहिल्या क्रमांकावर असेल, तर पाकिस्तान त्यांच्या गटात दुसऱ्या क्रमांकावर असेल.

भारत-पाकिस्तान कसे भिडतील?

साखळी सामन्यानंतर सुपर-4 टप्पा सुरू होणार आहे, जिथे आपापल्या गटातील टॉप-2 संघांचे सामने खेळल्या जाणार आहे. अशा परिस्थितीत भारत आणि पाकिस्तानचे संघ 4 सप्टेंबरला आमनेसामने येऊ शकतात. कारण इथे A1 आणि A2 संघाचा सामना होणार आहे. त्यामुळे या रविवारी संध्याकाळी 7.30 वाजता पुन्हा एकदा जगाला भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध पाहायला मिळणार आहे.

या सामन्याशिवाय भारताला सुपर-4 टप्प्यात आणखी दोन सामने होणार आहेत, जे बांगलादेश-श्रीलंका किंवा अफगाणिस्तानविरुद्ध असू शकतात. भारतीय संघाने हे सामने जिंकल्यास अंतिम फेरी गाठू शकतो. त्याचबरोबर पाकिस्तानलाही या संघांविरुद्ध लढावे लागणार असल्याने त्यांनाही अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे. म्हणजेच आशिया कपच्या अंतिम फेरीत भारत-पाकिस्तानचे संघही आमनेसामने येऊ शकतात. जे दुबईमध्ये 11 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'महाविकास आघाडीकडून व्होट जिहादचे काम; आता एक व्हावं लागेल'

Latest Maharashtra News Updates live : छत्तीसगढच्या कांकेरमध्ये ५ नक्सलवाद्यांचा खात्मा

Government Job : सरकारी नोकरी मिळवण्याचे सोपे मार्ग: भारतातील ९ सर्वात सोप्या सरकारी परीक्षा

Mahavikas Aghadi advertisement: महाविकास आघाडीच्या जाहिरातीवर ब्राम्हण समाजाचा तीव्र आक्षेप; बंदी आणण्याची मागणी

'बिग बॉस १८' मध्ये सलमानने घेतली अश्नीर ग्रोवरची शाळा; दोगलापन वाल्या डायलॉगवर भाईजान नाराज

SCROLL FOR NEXT