India Vs Pakistan Asia Cup 2022 Pakistan Team Will Ware Black armband For Flood Affected Pakistan esakal
क्रीडा

IND vs PAK : पाकिस्तान भारताविरूद्धच्या सामन्यात काळ्या फिती बांधून खेळणार

अनिरुद्ध संकपाळ

India Vs Pakistan Asia Cup 2022 : आशिया कपमध्ये भारत आपला पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत खेळणार आहे. भारताला गतवर्षीच्या टी 20 वर्ल्डकपमधील पराभवाचा बदला घेण्याची चांगली संधी आहे. तर दुसरीकडे दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर पुन्हा एकदा भारताला मात देण्यासाठी बाबर आझमचा संघ सज्ज आहे. हा सामना 28 ऑगस्ट म्हणजे आज सायंकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. मात्र या सामन्यात पाकिस्तानचा संघ आपल्या दंडावर काळ्या फिती (Black armband) घालून मैदानात उतरणार आहे.

पाकिस्तान क्रिकेट संघ आज आशिया कपमध्ये आपला पहिला सामना खेळत आहे. मात्र सामन्यादरम्यान ते पाकिस्तानच्या दक्षिण भागात आलेल्या पूरामुळे बेघर झालेल्या आणि पूरग्रस्त लोकांप्रती आपली सहानभुती दर्शवण्यासाठी आपल्या दंडावर काळ्या फिती लावणार आहे. पाकिस्तान सध्या त्यांच्या इतिहासातील सर्वात मोठ्या पूराचा सामना करत आहे. शनिवारी उत्तर क्षेत्रातील एक मोठ्या नदीवरील पूल कोसळल्याने हजारो लोकांना आपले घर सोडावे लागले आहे.

या सर्व पीडित लोकांप्रती सहानभुती आणि एकजुटता दाखवण्यासाठी पाकिस्तानचा क्रिकेट संघ आशिया कपमधील भारताविरूद्धच्या पहिल्या सामन्यात दंडाला काळ्या फिती बांधणार आहे. आशिया कपचा पहिला सामना 27 ऑगस्टला पाच वेळची विजेती श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात झाला. मात्र अफगाणिस्तानने श्रीलंकेला 105 धावात ढेर केले. हे आव्हान दोन गड्यांच्या मोबदल्यात 10 षटकात पूर्ण करून सामना आरामात जिंकला. अफगाणिस्तान आता ग्रुप B मध्ये 2 गुणांसह अव्वल स्थानावर पोहचला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT