क्रीडा

Ind Vs Pak : पाकिस्तानी खेळाडूंनी केली बालिश चूक! दोघेही एकमेकांकडे बघत राहिले अन्...

Kiran Mahanavar

India Vs Pakistan Asia Cup 2023 Super 4 : आशिया कपच्या सुपर-4 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना सुरू आहे. उभय संघांमधील हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जात आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

शुभमन गिल आणि कर्णधार रोहित शर्माने टीम इंडियाला दमदार सुरुवात करून दिली. त्याचबरोबर पहिल्या 10 षटकांमध्ये पाकिस्तानी गोलंदाजांना एकही यश मिळाले नाही. या सामन्यादरम्यान अनेक रोमांचक क्षण पाहायला मिळाले. शुबमन गिलला बाद करण्याची मोठी संधी पाकिस्तानकडे होती पण बालिश चुकीने त्यांच्याकडून ही संधी हिरावून घेतली.

नसीम शाहने आठव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर गिलला जवळपास बाद झाला केले. पण स्लिपवर उभ्या असलेल्या इफ्तिखार खान आणि इमाम उल हकने गिलला जीवदान दिले. नसीमचा चेंडू गिलने खेळण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन पहिल्या आणि दुसऱ्या स्लिपमध्ये गेला.

पण इफ्तिखार आणि इमाम दोघेही एकमेकांकडे बघत राहिले आणि चेंडू चार धावासाठी मधून गेला. जर कोणी हात पुढे केला असता तर तो झेल झाला असता आणि गिलचा डाव 30 धावांवरच संपुष्टात आला असता. यानंतर गिलने आपले अर्धशतक सहज पूर्ण केले.

मात्र, अर्धशतक पूर्ण केल्यानंतर गिलला मैदानावर फार काळ थांबला नाही. शाहीनने त्याला 58 धावांवर बाद केले. पण बाद होण्यापूर्वी गिलने आपले काम पूर्ण केले. कर्णधार रोहित शर्मा सोबत त्याने संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 121 धावा केल्या.

रोहितनेही अर्धशतक झळकावले. 17व्या षटकातील चौथ्या चेंडूवर शादाब खानने त्याला बाद केले. 49 चेंडूंचा सामना करताना रोहितने सहा चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 56 धावा केल्या. गिलने 58 धावांच्या खेळीत 10 चौकारांचा सामना केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: '...तर उद्धव येतोच कसा आडवा?', भोंग्यांवरून राज ठाकरेंनी सुनावलं, नेमकं काय म्हणाले?

Biotech IPO : 'ही' बायोटेक कंपनी आणणार 600 कोटीचा आयपीओ,अधिक जाणून घेऊयात...

Fact Check : इस्लामिक झेंडे फडकवत निघालेली बाईक रॅली अकोल्यातील काॅंग्रेस उमेदवाराच्या प्रचाराची नाही, व्हायरल दावा खोटा

'मुश्रीफ खूप प्रामाणिक नेता, त्यांना कोणतेही लेबल लावू नका'; शरद पवारांना उद्देशून काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?

Aditya Thackeray : महाविकास आघाडी जिंकली नाही तर गुजरात जिंकेल; आदित्य ठाकरेंचा घणाघात

SCROLL FOR NEXT