India vs Pakistan: सर्वात हाय व्होल्टेज क्रिटेक सामना असणारा भारत पाक सामना आज होणार आहे. हा सामना नेहेमीच जगाचे लक्ष आपल्याकडे खेचतांना पाहायला मिळते. अश्यावेळी नेहेमीच सामन्यावेळी खेळाडूंवर चांगलेच दर्पण असते. यामुळे आता भारताला हरवण्यासाठी पाकिस्तानचा प्लॅन काय आहे? हे बाबर आजम ने सांगितला आहे.
भारत-पाकिस्तान सामना नेहमीच सगळ्यांचे लक्ष खेचून घेतो. माझ्या पहिल्या सामन्याच्या वेळी खूप दडपण आले होते. दडपण हाताळताना अनुभव कामी येतो, असे माझे ठाम मत आहे, असे पाक कर्णधार बाबर आझमने सांगितले. संघातील ज्येष्ठ खेळाडू तरुण खेळाडूंना दडपण कसे हाताळायचे, हे शिकवतात. वर्तमानात राहाणे, एका वेळी एका चेंडूचा विचार करणे या गोष्टींवर लक्ष दिले, तर दडपण कमी होत जाते, असे तो म्हणाला.
माझा स्वत:चा खेळ गेल्या दोन सामन्यांत चांगला झाला नाहीये. आशा आहे की, योग्य सामन्यात माझ्या फलंदाजीला बहर येईल. शाहीन शाह आफ्रिदी मोठ्या सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजी करणारा मोठा खेळाडू आहे. असे मत त्याने मांडले.
भारतासमोर खेळताना त्याला वेगळा जोष जाणवतो. पाकिस्तान संघातील खेळाडूंना मी सतत सांगतो आहे की, चांगले क्षेत्ररक्षण संघाचे मनोबल उंचावते. तेव्हा सर्वस्व पणाला लावून क्षेत्ररक्षण करा आणि आपल्या गोलंदाजांच्या मागे उभे राहा, असे मत त्याने मांडले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.