India Vs Pakistan Asian Hockey Champions Trophy Chennai 2023 ाेोकोत
क्रीडा

India Vs Pakistan Hockey : भारताने पाकला 4 - 0 अशी धूळ चारत अव्वल स्थानावर पुन्हा केला कब्जा

अनिरुद्ध संकपाळ

India Vs Pakistan Asian Hockey Champions Trophy Chennai 2023 :

हिरो हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील आपल्या शेवटच्या लीग सामन्यात भारताने आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 4 - 0 असा पराभव केला. भारताने हा सामना जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान पुन्हा पटकावले. भारताचे आता 13 गुण झाले असून चांगल्या गोलफरकांच्या आधारे भारताने अव्वल स्थान पटकावले.

भारताकडून हरमनप्रीत सिंहने सर्वाधिक 2 गोल केले. भारताने पाकिस्तानविरूद्धच्या तिसऱ्या सामन्यात 3 गोल पेनाल्टी कॉर्नरवर केले. तर सामना संपण्यासाठी 5 मिनिटे शिल्लक असताना आकाशदीप सिंगने मैदानी गोल करत भारताची आघाडी 4 - 0 पर्यंत वाढवली. या सामन्यादरम्यान दोन्ही संघांना दोन दोन ग्रीन कार्ड मिळाले. (Indian Men's Hockey Team)

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पहिल्या मिनिटांपासूनच चुरशीचा होणार असं वाटत होतं. बलाढ्या भारतीय संघाने पाकिस्तानच्या गोलपोस्टवर चढाया करत दबाव वाढवला होता. आठव्या मिनिटाला मनदीप सिंहला गोलकरण्याची संधी होती मात्र त्याला ही संधी साधता आली नाही. (Pakistan Men's Hockey Team)

मात्र पहिल्या क्वार्टर संपायला काही सेकंद शिल्लक असताना हरमनप्रीत सिंहला पेनाल्टी कॉर्नरवर गोल करण्याची संधी मिळाली. ही संधी हरमनप्रीतने गोलमध्ये रूपांतरित करत भारताचे गोलचे खाते उघडले.

यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्येही हरमनप्रीत सिंहला अजून एक पेनाल्टी कॉर्नर मिळाला. 23 व्या मिनिटाला गोल करत हरमनने भारताची आघाडी 2 - 0 अशी वाढवली. यानंतर 36 व्या मिनिटाला भारताला अजून एक पेनाल्टी कॉर्नर मिळाला. यावर जुगराज सिंहने तिसरा गोल केला.

तीन क्वार्टरचा खेळ संपला त्यावेळी भारताकडे 3 - 0 अशी आघाडी मिळवली होती. मात्र चौथ्या क्वार्टरमध्ये भारताला लवकर गोल करण्याची संधी मिळाली नव्हती. भारत सामना 3 - 0 असा जिंकणार असे वाटत असतानाच 55 व्या मिनिटाला आकाशदीप सिंहने मैदानी गोल करत भारताला चौथा गोल करून दिला.

पाकिस्तानला संपूर्ण सामन्यात भारतावर एकही गोल करता आला नाही. सामन्यात दोन्ही संघांना प्रत्येकी 2 ग्रीन कार्ड मिळाले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT