IND vs PAK Rain Update esakal
क्रीडा

IND vs PAK Rain Update : पावसामुळे सामना रद्द झाला तर होणार पाकिस्तानचा फायदा, भारताची वाढणार अडचण

अनिरुद्ध संकपाळ

IND vs PAK Rain Update : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याचा थरार तब्बल 314 दिवसांनी पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. शेवटचा भारत - पाकिस्तान सामना हा 23 ऑक्टोबर 2022 ला झाला होता. हा सामना भारताने जिंकला होता. मात्र आज आशिया कपच्या या सर्वात हाय व्होल्टेज सामन्यावर पावसाचे ढग दाटले आहेत.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप 2023 च्या पहिल्या सामन्यात पाऊस व्यत्यय आणू शकतो. सध्या जरी आकाश निरभ्र असलं आणि नाणेफेक वेळवेर झाली असली तरी साधारणपणे सायंकाळी 5 वाजता पाऊस हजेरी लावण्याची दाट शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार 60 टक्के पावसाची शक्यता आहे. यामुळे सामन्याचा निर्णय डकवर्थ लुईस नियमानुसार होण्याची देखील शक्यता आहे. वनडेमध्ये डकवर्थ लुईस नियमानुसार किमान 20 षटकांचा खेळ होणे गरजेचे आहे.

पाकिस्तानचा होणार फायदा

पासामुळे जर सामना होऊ शकला नाही तर दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण मिळेल. यामुळे जर सामना रद्द झाला तर पाकिस्तान थेट सेमी फायनलमध्ये जाणार. त्यांनी आपल्या पहिल्या सामन्यात नेपाळचा 238 धावांची पराभव केला होता. त्यामुळे त्यांना 2 गुण मिळाले आहेत. जर भारत - पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द झाला तर त्यांना 1 गुण मिळेल. त्यांचे 3 गुण होऊन ते सेमी फायनलसाठी पात्र होतील.

भारत - पाकिस्तान आशिया कपमध्ये तीनवेळा भिडणार?

भारत - पाकिस्तान यांच्यात आशिया कपमध्ये तीनवेळा भिडण्याची शक्यता आहे. साखळी फेरीनंतर जर दोन्ही संघ सुपर 4 मध्ये पोहचले तर ते 10 सप्टेंबरला एकमेकांसोबत भिडणार आहेत. जर दोन्ही संघ सुपर 4 मध्ये चांगली कामगिरी केली आणि पहिल्या दोन स्थानावर राहिले तर आशिया कपची फायनल देखील भारत आणि पाकिस्तान यांच्यातच होईल.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Latest Maharashtra News Updates : तुम्ही मला निवडलं, अजित पवारांना निवडलं आता युगेंद्र पवारला निवडून द्या - शरद पवार

IND vs AUS: 'रोहितच्या जागेवर असतो, तर मी पण...', ऑस्ट्रेलियाच्या हेडचं हिटमॅनच्या सुट्टीवर भाष्य

AUS vs PAK : पँट सांभाळू की चौकार ...? संकटात सापडला पाकिस्तानचा खेळाडू, Video Viral

Ajit Pawar: अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली; दादांनी स्वतः दिला आवाज अन् मुलगी पुढे आली

SCROLL FOR NEXT