India vs Pakistan World Cup 
क्रीडा

World Cup India vs Pakistan : वर्ल्ड कप जिंकला तरी पाकिस्तान टीमवर चिडले होते फॅन्स, माकडउड्या सोडून बरंच काही...

Kiran Mahanavar

India vs Pakistan World Cup : एकदिवसीय वर्ल्डकप सुरू होऊन एक आठवडा झाला आहे. पहिल्या आठवड्यातच अनेक रोमांचक सामने पहिला मिळाले. वर्ल्डकप मधील हाय-व्होल्टेज सामना यंदा १४ ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगणार आहे. वर्ल्डकप मध्ये 1992 ला भारत आणि पाकिस्तान पहिल्यांदाच भिडले होते.

या सामन्यादरम्यान एक मोठा किस्सा घडला होता. त्या ऐतिहासिक सामन्यात भारतीय यष्टीरक्षक किरण मोरे आणि पाकिस्तानी फलंदाज जावेद मियांदाद यांच्यातील भांडणाची बरीच चर्चा रंगली होती आणि ही घटना क्रिकेट इतिहासात अजरामर झाली. जेव्हा कधी भारत पाकिस्तान वर्ल्डकप मध्ये समोरासमोर तेव्हा या सामन्याची चाहत्यांना आठवण होते.

तर झालं असं होते की, त्यावेळी विकेटच्या मागून किरण मोरेला काही ना काही बडबडत करायची सवय होती. आणि पंचांना अपिल करताना तो उड्या मारायचा. त्या सामन्यात ही सचिन तेंडुलकर गोलंदाजी करताना त्याचा एक चेंडू जावेद मियांदादच्या पॅडवर जाऊन लागला. त्यावेळी विकेटच्या मागे असणाऱ्या किरण मोरेने उड्या मारत जोरदार अपिल केली. मात्र अंपायरने ती अपिल फेटाळली. मोरेची ही अपिल काय महिती पण मियांदादच्या डोक्यात गेली.

त्याच षटकात किरण मोरेकडून जावेद मियांदादला धावबाद करण्याचा प्रयत्न हूकला. आणि त्यानंतर मियांदादने माकड उड्या मारण्यास सुरूवात केली. कारण अपिल करताना मोरे उड्या मारायचा त्याची नक्कल करण्याच्या हा प्रयत्न होता. त्यानंतर क्रिकेट इतिहासात हा किस्सा अजरामर झाला.

त्यासामन्यात मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने या सामन्यात पाकिस्तानचा 40 धावांनी पराभव केला होता. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा हा पहिलाच वर्ल्डकप होता. या सामन्यात सचिनने आपल्या संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. तो 54 धावांवर शेवटपर्यंत नाबाद राहिला आणि गोलदांजी करताना 1 विकेट घेतला होता. यासोबत या सामन्यात कपिल देवने गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्हीत आपले कौशल्य दाखवले. फलंदाजी करताना त्याने 35 धावा केल्या आणि गोलंदाजी करताना त्याने पाकिस्तान संघाच्या दोन खेळाडूंना पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते.

फेब्रुवारी महिन्यात झालेल्या 1992 च्या वर्ल्डकप स्पर्धेत एकूण 9 संघांनी भाग घेतला होता. पाकिस्तान संघ भारताला हरवू शकला नसला तरी वर्ल्डकप नक्कीच जिंकला. इम्रान खानच्या नेतृत्वाखाली अंतिम सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडचा 22 धावांनी पराभव करत ट्रॉफीवर कब्जा केला होता. वर्ल्डकप जिंकल्यानंतर पाकिस्तान संघ आनंदात मायदेशात आला खरा पण फॅन्स त्यांच्यावर नाराज आणि भडकले होते. कारण काय तर भारताविरुद्धचा त्यांचा पराभव....!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinod Tawade: हाॅटेल मध्ये 5 कोटी वाटल्याचा बविआचा आरोप, विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया

Vinod Tawde : 'भाजपमधील बहुजन चेहरा संपविण्याचा हा डाव; गृहखात्याकडून तावडेंवर पाळत' राऊतांचा इशारा कोणाकडे?

IND vs AUS: अश्विनकडून शिकायला मिळते...! कसोटी मलिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या स्टार गोलंदाजाकडून कौतुकाचा वर्षाव

Pune drink and drive: दारूच्या नशेत स्कॉर्पिओने रिक्षाचालकाला उडवले, अल्पवयीन तरुणाचा प्रताप, पुण्यात कार प्रकरणाची पुनरावृत्ती

कर्नाटकातील काँग्रेस सरकार कोसळणार? सत्ता स्थापनेपासूनच 'ऑपरेशन कमळ'चे प्रयत्न, आमदारांचा मोठा गौप्यस्फोट

SCROLL FOR NEXT