India Vs Pakistan World Cup 2023 : भारताने पाकिस्तानचा 7 विकेट्स आणि जवळपास 20 षटके राखून पराभव करत यंदाच्या वर्ल्डकपमधील आपला सलग तिसरा विजय साजरा केला. पाकिस्तानचे 192 धावांचे आव्हान पार करताना भारताचा कर्णधार रोहित शर्माने 63 चेंडूत 86 धावा ठोकल्या. त्यानंतर श्रेयस अय्यरने नाबाद 53 धावा ठोकत विजयावर शिक्कामोर्तब केलं.
भारताने वर्ल्डकप 2023 च्या तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा डाव 191 धावात संपुष्टात आणत सामन्यावर पकड निर्माण केली. भारताकडून प्रमुख पाचही गोलंदाजांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेत पाकिस्तानी फलंदाजीचं कंबरडं मोडलं.
पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक 50 तर मोहम्मद रिझवानने 49 धावांची खेळी केली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी रचत भारताला टेन्शन दिले होते. मात्र मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांनी पाकिस्तानची मधील फळी उडवली. त्यानंतर पांड्या आणि जडेजाने शेपुट गंडाळत पाकिस्तानचा डाव 43 षटकात संपवला.
रोहित शर्मा 86 धावांवर बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरने नाबाद 53 धावा करत भारताला 30.3 षटकात पाकिस्तानचे 192 धावांचे आव्हान पार केले. भारताने 7 विकेट्स राखून विजय मिळवला. भारताचा हा यंदाच्या वर्ल्डकपमधील सलग तिसरा विजय आहे.
भारताचा कर्णधार रोहित शर्माने 63 चेंडूत 86 धावा ठोकल्या होत्या. मात्र शाहीन आफ्रिदीने त्याला इफ्तिकार करवी झेलबाद करत भारताला तिसरा धक्का दिला. याचबरोबर रोहित शर्माचे शतक हुकले.
पाकिस्तानचे 192 धावांचे आव्हान पार करताना भारतीय संघाने आक्रमक सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. रोहित फटकेबाजी करत असतानाच शाहीन आफ्रिदीने भारताला पहिला धक्का दिला.
त्याने गिलला 16 धावांवर बाद केले. त्यानंतर आलेला विराट कोहली देखील 16 धावांची भर घालून परतला. त्याला हसन अलीने बाद केले. मात्र रोहित शर्माने एका बाजूने दमदार फलंदाजी करत भारताला शतकाजवळ पोहचवले होते. त्याने 36 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.
बुमराह आणि सिराजने पाकिस्तानची मधली फळी उडवल्यानंतर हार्दिक पांड्या आणि रविंद्र जडेजाने शेपटाला फारशी वळवळ करू दिली नाही. अखेर पाकिस्तानचा डाव 191 धावात संपुष्टात आला.
आपल्या पहिल्या स्पेलमध्ये विकेट घेण्यात अपयशी ठरेलल्या जसप्रीत बुमराहने दुसऱ्या स्पेलमध्ये दांड्या गुल करण्याचा धडाकाच लावला. त्याने आधी रिझवान आणि नंतर शादाब खानचा त्रिफळा उडवत पाकिस्तानची अवस्था 7 बाद 171 धावा अशी केली.
मोहम्मद रिझवानने झुंजार फलंदाजी करत 49 धावांची खेळी केली होती. मात्र त्याच्या अर्धशतक पूर्ण होण्यासाठी 1 धावेची गरज असताना बुमराहने त्याचा त्रिफळा उडवला.
कुलदीप यादवने सौद शकीलला 32 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर बाद केल्यानंतर इफ्तिकार अहमद फलंदाजी करण्यास आला. त्याने पुढच्याच चेंडूवर चौकार मारत चांगली सुरूवात केली होती. मात्र षटकाच्या शेवटच्या चेंडूवर इफ्तिकारचा त्रिफळा उडवत भारताला पाचवे यश मिळवून दिले.
बाबर आझम बाद झाल्यानंतर आलेल्या सौद शकीलला कुलदीप यादवने 6 धावांवर बाद करत पाकिस्तानला चौथा धक्का दिला.
गेल्या दोन सामन्यात शांत राहिलेली बाबरची बॅट बरोबर भारताविरूद्ध तळपली. बाबर आझमने भारताविरूद्धच्या सामन्यात अर्धशतकी खेळी करत डाव सावरला होता. त्याने रिझवान सोबत 82 धावांची झुंजार भागीदारी रचली होती. मात्र त्यानंतर लगेचच सिराजने त्याचा 50 धावांवर त्रिफळा उडवत भारताला मोठा दिलासा दिला.
पाकिस्तानचे दोन्ही सलामीवीर माघारी गेल्यानंतर कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी तिसऱ्या विकेटसाठी चांगली भागीदारी रचत पाकिस्तानला 20 षटकात शतक पार करून दिले.
पाकिस्तानची दुसरी विकेट पडली आहे. हार्दिक पांड्याने 13व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर पाकिस्तानी सलामीवीर इमाम हकला बाद केले. इमाम 38 चेंडूत 36 धावा करून बाद झाला.
पाकिस्तानची धावसंख्या 13 षटकात 2 बाद 74 धावा आहे. बाबर आझम 16 धावांवर तर मोहम्मद रिझवान एका धावेवर नाबाद आहे.
पाकिस्तानच्या डावातील 10 षटके पूर्ण झाली आहेत. त्याने एका विकेटवर 49 धावा केल्या आहेत. अब्दुल्ला शफिकला बाद केल्यानंतर कॅप्टन बाबर आझम इमाम उल हक खेळत आहे. इमाम 23 धावांवर तर बाबर पाच धावांवर नाबाद आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात पहिली विकेट पडली आहे. मोहम्मद सिराजने डावाच्या आठव्या षटकातील शेवटच्या चेंडूवर अब्दुल्ला शफिकला बाद केले. शफिकला त्याचा चेंडू लेग साइडने खेळायचा होता, पण तो चुकला. चेंडू थेट त्याच्या पॅडवर लागला. 24 चेंडूत 20 धावा करून तो बाद झाला.
शफीकने इमाम उल हकसह पहिल्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी केली. शफीक बाद झाल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम क्रीझवर आला आहे. पाकिस्तानची धावसंख्या आठ षटकांत एका विकेटवर 41 धावा आहे.
पाकिस्तानचे सलामीवीर इमाम उल हक आणि अब्दुल्ला शफिक यांनी दमदार संघाला दमदार सुरूवात करून दिली. या दोघांनी 4 षटकात 23 धावा करून दिल्या.
रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या डावात ड्यू पडण्याची शक्यता असल्याने रोहितने चेस करण्याचा निर्णय घेतला.
बाबर आझम आजच्या सामन्याबद्दल म्हणाला की, मी भूतकाळावर जास्त लक्ष देत नाही. मी भविष्यावर जास्त लक्ष देतो. असे रेकॉर्ड हे तोडण्यासाठीच बनवले जातात. मी ते तोडण्याचा प्रयत्न करत आहे.
भारत - पाकिस्तान सामन्यापूर्वी आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम हा हॉस्टार आणि स्टार स्पोर्ट्सवर प्रक्षेपित होणार नाहीये. हा कार्यक्रमक फक्त तिकीट काढून स्टेडियममध्ये दाखल झालेल्या प्रेक्षकांसाठीच असणार आहे.
भारत - पाकिस्तान सामन्यापूर्वी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी बॉलीवूड स्टार नरेंद्र मोदी स्टेडियमवर अवतरणार आहेत. अरिजीत सिंह, शंकर महादेवन, सुखविंदर सिंग हे आघाडीचे गायक आपल्या गाण्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.