अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. दोन्ही देशांमधील हा एकूण 135 वा एकदिवसीय सामना आहे. याआधी दोन्ही देशांमध्ये 134 सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये भारताने 56 सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानने 73 सामने जिंकले. विशेष म्हणजे वनडे वर्ल्डकपमध्ये जेव्हाही दोन्ही देश आमनेसामने आले, तेव्हा सातही वेळा भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे.
याआधी नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान सामना फक्त एकदाच झाला आहे, जो 12 एप्रिल 2005 रोजी खेळला गेला, त्या सामन्यात पाकिस्तानच्या इंझमाम उल हकने सचिन तेंडुलकरला शेवटच्या चेंडूवर चौकार मारत पाक संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता. त्यासामन्यात प्रथम फलंदाजी करताना, सचिन तेंडुलकरच्या 123 धावांमुळे भारताने 315/6 धावा केल्या होत्या. पण इंझमामने पाकिस्तानसाठी 60* धावांची मॅच-विनिंग इनिंग खेळली.
दोन्ही देशांमधला पहिला एकदिवसीय सामना 1 ऑक्टोबर 1978 रोजी पाकिस्तान मधील क्वेटा येथे खेळला गेला. तो सामना 40 षटकांचा खेळला गेला, भारताने प्रथम फलंदाजी करताना 170/7 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या संघाला 166 धावा करता आल्या आणि 4 धावांनी भारताने सामना जिंकला. त्या सामन्यात सामनावीर मोहिंदर अमरनाथने बॅटतून 51 धावा आणि बॉलिंग मध्ये दोन विकेट घेत आश्चर्यकारक कामगिरी केली होती.
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने 134
पाकिस्तान जिंकला- 73, भारत जिंकला- 56, 5 सामन्याचा निकाल नाही...
टी-20 आंतरराष्ट्रीय सामने 12 :
भारत जिंकला- 9, पाकिस्तान जिंकला- 3
कसोटी सामने 59 :
पाकिस्तान जिंकला-12, भारत जिंकला-9, 38 -ड्रॉ
पाकिस्तान विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात भारतासाठी सर्वात यशस्वी भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर आहे. त्याने पाकिस्तानविरुद्ध 69 सामन्यात 2526 धावा केल्या आहेत. त्यानंतर राहुल द्रविड (58 सामने, 1899 धावा), मोहम्मद अझरुद्दीन (64 सामने, 1657 धावा), सौरव गांगुली (53 सामने, 1652 धावा), युवराज सिंग (38 सामने, 1360 धावा), एमएस धोनी (36 सामने, 1231 धावा)...!
सध्याच्या काळातील फलंदाजांमध्ये, विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघे पाकिस्तानविरुद्ध सर्वात यशस्वी भारतीय फलंदाज आहे. विराट कोहलीने 15 सामन्यांमध्ये 55.16 च्या सरासरीने आणि 100.60 च्या स्ट्राईक रेटने 662 धावा केल्या आहेत. तर रोहितने 18 एकदिवसीय सामन्यांमध्ये 49.18 च्या सरासरीने आणि 89.22 च्या स्ट्राइक रेटने 787 धावा केल्या आहेत.
केएल राहुलने पाकिस्तानविरुद्ध 2 सामने खेळले आहेत, त्याने या दोन सामन्यात 1 शतक आणि 1 अर्धशतकासह 168 धावा केल्या आहेत. याशिवाय हार्दिक पांड्या (6 सामने, 209 धावा), रवींद्र जडेजा (8 सामने, 139 धावा) यांची कामगिरी फारशी दमदार राहिलेली नाही.
अनिल कुंबळे आणि जवागल श्रीनाथ हे एकदिवसीय फॉरमॅटमध्ये पाकिस्तानविरुद्ध भारताचे सर्वकाळचे सर्वात यशस्वी गोलंदाज आहेत. कुंबळे आणि श्रीनाथ या दोघांनी मिळून 54 विकेट घेतल्या आहेत. यानंतर व्यंकटेश प्रसाद (43), कपिल देव (42), इरफान पठाण (34), अजित आगरकर (32) आहेत.
सध्याच्या काळातील गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमारने 10 सामन्यांत 14 विकेट घेतल्या आहेत, पण सध्या तो संघाचा भाग नाही. त्याचवेळी रविचंद्रन अश्विनने पाकिस्तानविरुद्धच्या 8 एकदिवसीय सामन्यांमध्ये 10 विकेट्स घेतल्या आहेत आणि रवींद्र जडेजानेही 11 सामन्यांमध्ये तेवढ्याच विकेट घेतल्या आहेत.
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियम (आताचे नरेंद्र मोदी स्टेडियम) यावर रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. त्याने 5 एकदिवसीय सामन्यात 114 च्या सरासरीने 342 धावा केल्या होत्या. तर रोहित शर्माने 5 सामन्यात 44.20 च्या सरासरीने 221 धावा केल्या आहेत. तर सचिन तेंडुलकर (5 सामने, 221 धावा) केल्या. मात्र विराट कोहलीने येथे 7 एकदिवसीय सामन्यांमध्ये 25.14 च्या सरासरीने 176 धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत हे भारतासाठी चिंतेचे कारण ठरू शकते.
अहमदाबादमधील सर्वात यशस्वी भारतीय गोलंदाज कपिल देव (6 सामने, 10 विकेट) आहेत. त्याचवेळी प्रसिद्ध कृष्णाने येथे 3 वनडे सामन्यात 9 विकेट घेतल्या आहेत. रविचंद्रन अश्विन आणि मोहम्मद सिराज यांनी येथे 3 एकदिवसीय सामने खेळले असून दोघांनी 5-5 विकेट घेतल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.