India Vs Pakistan : पाकिस्तानला वर्ल्डकप सामन्यांमध्ये सलग 12 वेळा भारताकडून पराभव सहन करावा लागला आहे. 2021 च्या टी 20 वर्ल्डकपमध्ये अखेर पाकिस्तानने 1992 पासून सुरु असलेली पराभवाची मालिका अखेर खंडीत केली. पाकिस्तानने भारताला 10 विकेट्सनी पराभूत केलं. (World Cup 2023)
मात्र 2022 च्या टी 20 वर्ल्डकपमध्ये पुन्हा एकदा भारताने पाकिस्तानला मात दिली. आता वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये हे दोन्ही संघ अहमदाबादमध्ये भिडणार आहेत. या पार्शभुमीवर पाकिस्तानचा माजी कर्णधार वकार युनूसने पाकिस्तान वर्ल्डकपमधील भारताविरूद्धचा सामना का हरतो याचे कारण सांगितले. (Waqar Younis News)
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वकार म्हणाला की, 'आमच्यावेळी दबाव एवढी मोठी गोष्ट नव्हती. आता दबाव जास्त वाटतोय. तुम्ही एखाद्या संघाविरूद्ध जेवढं कमी खेळाल. तेही एका मोठ्या संघाविरूद्ध तर त्या सामन्यात दबाव तर येतोच.'
'विशेषकरून भारत पाकिस्तान सामना असेल तर दबाव अधिक असतो. आमच्या काळात मात्र हा कमी होता कारण आम्ही सुरूवातीच्या काळात एकमेकांविरूद्ध खूप क्रिकेट खेळलो आहे.'
वकारने पाकिस्तान वर्ल्डकपमध्ये भारताकडून का हरतो यावर म्हणाला की, आम्ही भारताविरूद्ध चोक करत होतो. मी जसं सांगितलं तसं आम्ही त्या काळात दबाव चांगल्या पद्धतीने हाताळत होते. आमच्याकडे मॅच विनर्स आहेत ते आम्हाला जिंकून देतील.'
भारत आणि पाकिस्तान हे एकतर आशिया कप किंवा आयसीसी इव्हेंटमध्ये एकमेकांविरूद्ध खेळतात. 2003 च्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा कर्णधार असलेल्या वकार युनूसने मान्य केलं की बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघ दबाव हातळण्यात यशस्वी ठरले. त्याने पाकिस्तानच्या चार मॅच विनर्सची नावे सांगितली.
आमच्याकडे सामना जिंकून देणारे खेळाडू आहेत. एकटच्या जीवावर सामना जिंकून देणाऱ्या खेळाडूंमध्ये बाबर आझम, शाहीन अफ्रिदी, फखर जमान या खेळाडूंचा समावेश आहे. इमाम देखील दमदार खेळी करतोय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.