South Africa vs India 1st ODI Weather Report News in marathi sakal
क्रीडा

SA Vs IND 1st ODI : टी-20 मालिकेत पावसाचा कहर, आता पहिल्या वनडेवरही काळे ढग, जाणून घ्या कसे असेल हवामान?

Kiran Mahanavar

South Africa vs India 1st ODI Weather Report News : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील टी-20 मालिकेचा खेळ पावसामुळे खराब झाला होता. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता, त्यानंतर उरलेल्या 2 सामन्यात दोन्ही संघांनी 1-1 असा विजय मिळवला आणि मालिका बरोबरीत सुटली.

त्याच वेळी, आता 17 डिसेंबरपासून दोन्ही संघांची एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे. मात्र सामन्यावर संकटाचे ढग दाटून आले आहेत. Accuweather नुसार, 17 डिसेंबर रोजी 56 टक्के आभाळ काळ्या ढगांनी झाकलेले असेल.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना जोहान्सबर्ग येथे खेळला जाणार आहे. याच मैदानावर टीम इंडियाने शेवटच्या टी-20 सामन्यात यजमान संघाचा पराभव केला होता.

Accuweather च्या अहवालानुसार 17 डिसेंबरला पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, फारसा पाऊस पडण्याची शक्यता नाही. मात्र, काही तास पाऊस पडल्यास कोणत्याही संघाचे नुकसान होऊ शकते. दुसऱ्या टी-20 सामन्यात पावसामुळे भारताचा खेळ खराब झाला होता. नवीन लक्ष्य मिळाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ वरचढ दिसत होता.

कोणत्याही सामन्यात जेव्हा पावसाची शक्यता असते. तेव्हा नाणेफेक संघांसाठी खूप महत्त्वाची ठरते. कोणताही संघाला नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करायला आवडेल. टीम इंडियाच्या काही खेळाडूंसाठी एकदिवसीय मालिका खूप महत्त्वाची आहे, ज्यामध्ये रिंकू सिंगसारख्या उगवत्या स्टारचाही समावेश आहे. आता 17 डिसेंबरला होणाऱ्या सामन्यावर पावसाचा परिणाम होतो की नाही हे पाहायचे आहे.

एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ - ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार/विकेटकीपर), संजू सॅमसन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग, आवेश खान. आकाश दिवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT