India vs South Africa 2nd ODI Match Timings sakal
क्रीडा

IND vs SA 2nd ODI : वेळ बदलली! 1:30 वाजता नाही तर 'या' वेळी खेळला जाणार भारत-दक्षिण आफ्रिका सामना

Kiran Mahanavar

India vs South Africa 2nd ODI Match Timings : टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला विजयाने सुरुवात केली आहे. जोहान्सबर्गच्या न्यू वांडरर्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने 8 गडी राखून विजय मिळवला.

आता या मालिकेतील दुसरा सामना पोर्ट एलिझाबेथ येथील सेंट जॉर्ज पार्क स्टेडियमवर खेळला जाणार आहे. पहिला सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरु झाला होता. पण दुसऱ्या सामन्याची वेळ वेगळी आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेतील दुसरा वनडे सामना मंगळवार 19 डिसेंबरला खेळला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी साडेचार वाजता सुरू होईल. त्याच वेळी, नाणेफेक 4 वाजता होईल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर चाहत्यांना या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येईल. दुसरीकडे, थेट प्रवाह डिस्ने प्लस हॉटस्टारवर असेल.

एकदिवसीय सामन्यात दोन्ही संघांचे हेड टू हेड रेकॉर्ड

दोन्ही संघांमध्ये एकूण 92 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये भारतीय संघ केवळ 39 जिंकला आहे तर दक्षिण आफ्रिकेने 50 सामने जिंकले आहेत. आफ्रिकेत भारताने आतापर्यंत खेळलेल्या 38 पैकी 11 सामने जिंकले आहेत, तर 25 सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा एकदिवसीय संघ

भारत : केएल राहुल (कर्णधार/विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, अवेश खान, अरदीप खान सिंह, आकाश दीप.

दक्षिण आफ्रिका : एडन मार्कराम (कर्णधार), ओटनील बार्टमन, नांद्रे बर्जर, टोनी डी जोर्झी, रीझा हेन्ड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, मिहलाली एमपोंगवाना, डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, अँडिले फेहलुक्वायो, तबरेझ शम्सी, रॅसी व्हॅरेसेन केडर, रॅसी व्हॅनिले , लिझार्ड विल्यम्स.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: आदित्य ठाकरेंनी लाज राखली ;वरळीचा गड राखला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: फुलंब्री विधानसभा संघात अनुराधा चव्हाण 28900 मताने आघाडीवर

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

SCROLL FOR NEXT