IND vs SA 2nd T20I Live esakal
क्रीडा

IND vs SA 2nd T20I : मिलरची शतकी खेळी मात्र विजयासाठी पडल्या 16 धावा कमी

अनिरुद्ध संकपाळ

IND vs SA 2nd T20I : भारताने ठेवलेले 238 धावांचे आव्हान पार करताना डेव्हिड मिलर (47 चेंडूत नाबाद 106 धावा) आणि क्विंटन डिकॉक (48 चेंडूत 69 धावा) यांनी झुंजार खेळी केली. मात्र या दोघांच्या दीडशतकी भागीदारीनंतरही आफ्रिका 221 धावांपर्यंच पोहचू शकली. भारताने दुसरा टी 20 सामना16 धावांनी जिंकत दक्षिण आफ्रिकेविरूद्धची मालिका 2 - 0 अशी खिशात टाकली. भारताकडून सूर्यकुमार यादवने 22 चेंडूत 61 धावांची खेळी केली तर केएला राहुलने 57, विराट कोहलीने 49 तर रोहित शर्माने 43 धावांची खेळी केली. गोलंदाजीत अर्शदीपने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.

HIGHLIGHTS  : डेव्हिड मिलरचे शतक मात्र विजय भारताचाच

डेव्हिड मिलरने भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत नाबाद 106 धावांची शतकी खेळी केली. मात्र अखेर दक्षिण आफ्रिकेला 20 षटकात 3 बाद 221 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताने सामना 16 धावांनी जिंकून मालिका 2 - 0 अशी खिशात टाकली.

मिलर - डिकॉकची शतकी भागीदारी

डेव्हिड मिलर आणि क्विंटन डिकॉक यांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद शतकी भागीदारी रचत आफ्रिकेला 16 व्या षटकात 150 च्या पार पोहचवले.

RSA 102-3 (12) : किलर मिलरची आक्रमक फलंदाजी

पॉवर प्लेमध्येच तीन धक्के बसल्यानंतर डेव्हिड मिलर आणि क्विंटन डिकॉक या डावखुऱ्या जोडीने आफ्रिकेचा डाव सावरला. डेव्हिड मिलरने तुफान फटकेबाजी करत 12 व्या षटकात आफ्रिकेचे शतक धावफलकावर लावले. त्याला डिकॉकने बॉल टू रन खेळत चांगली साथ दिली. डेव्हिड मिलरने 25 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

47-3 : आफ्रिकेला सुरूवातीला तीन धक्के

भारताने विजयासाठी ठेवलेल्या 238 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेची सुरूवात खराबा झाली. अर्शदीप सिंगने दुसऱ्याच षटकात आफ्रिकेला दोन धक्के दिले. त्याने टेम्बा बाऊमाला आणि रिली रासोव्हला शुन्यावर बाद केले.

त्यानंतर एडिन माक्ररमने 19 चेंडूत आक्रमक 33 धावांची खेळी केली. मात्र ही त्याची खेळी अक्षर पटेलने दांडू गुल करत संपवली.

दिनेश कार्तिकचा कॅमियो

दिनेश कार्तिने शेवटच्या षटकात दमदार फलंदाजी करत 7 चेंडूत 17 धावा चोपल्या. याजोरावर भारताने आफ्रिकेसमोर 20 षटकात 3 बाद 237 धावा केल्या. विराट कोहलीने नाबाद 49 धावांचे योगदान दिले.

209-3 : सूर्यकुमार आक्रमक अर्धशतकानंतर बाद 

सूर्यकुमार यादवने 22 चेंडूत 61 धावा चोपून भारताला द्विशतकापार पोहचवले. मात्र अखेरीस तो धावाबाद झाला.

सूर्यकुमारचा धडाका; 15 व्या षटकातच टीम इंडिया 150 पार

सूर्यकुमार यादवने आल्यापासून चौकार आणि षटकारांची आतशबाजी करत भारताला 15 षटकात 2 बाद 155 धावांपर्यंत पोहचवले.

107-2 : भारताला मोठा धक्का 

रोहित बाद झाल्यानंतर राहुलने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र त्यानंतर लगेचच केशव महाराजने त्याला 57 धावांवर पायचित बाद करत भारताचा दुसरा सेट बॅट्समन पॅव्हेलियनमध्ये धाडला.

केएल राहुलचे दमदार अर्धशतक

रोहित शर्मा 43 धावांवर बाद झाल्यानंतर केएल राहुलने लगेचच आपले अर्धशतक 24 चेंडूत पूर्ण केले.

96-1 : रोहित शर्माचे अर्धशतक हुकले

राहुल सोबत 96 धावांची सलामी दिल्यानंतर रोहित शर्मा 37 चेंडूत 43 धावा करून केशव महाराजला षटकार मारण्याच्या नादात झेलबाद झाला.

IND 57/0 (6) : भारताची दमदार सुरूवात 

पहिल्या तीन षटकात फारसे हात खोलण्याची संधी न मिळालेल्या रोहित - राहुल जोडीने पुढच्या तीन षटकात तुफान फटकेबाजी करत भारताला 6 षटकात बिनबाद 57 धावांपर्यंत पोहचवले.

भारताची आक्रमक सुरूवात करण्याचा प्रयत्न 

भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी पॉवर प्लेची आक्रमक सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र या दोघांना भारताला पहिल्या 3 षटकात 21 धावांपर्यंतच मजल मारून देता आली.

आफ्रिकेने नाणेफेक जिंकली

दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही तर आफ्रिकेने शामसीच्या जागी एन्गिडाला संधी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Video: चार सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; स्मृती इराणी घेणार सभा; नेमकं काय घडलं?

Latest Maharashtra News Updates live : या निवडणुकीत आम्ही बाळासाहेबांच्या विचारांसाठी लढतोय : संजय राऊत

Beed Assembly Election News : एकीकडे स्थलांतर दुसरीकडे मतदानाचे नियोजन; मुकादमांच्या मध्यस्थीने प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे प्रयत्न

महाविकास आघाडीच्या 'त्या' सभेला शरद पवार का आले नाहीत? सांगण्यासारखंच काय असतं तर..; काय म्हणाले उदयनराजे?

Holiday Fun Ideas : सुट्टीच्या दिवशी घरी करा 'ही' 5 हलकी-फुलकी कामे, मूड होईल एकदम फ्रेश

SCROLL FOR NEXT