rohit sharma t20 world cup 2022 sakal
क्रीडा

Ind va Sa : T20 वर्ल्ड कप आधी काही प्रश्न सोडवण्याची रोहितला अखेरची संधी

टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत होणाऱ्या अंतिम परीक्षेत उतरण्यापूर्वी अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे शोधण्याची...

Kiran Mahanavar

Rohit Sharma T20 World Cup 2022 : ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत होणाऱ्या अंतिम परीक्षेत उतरण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा अवघड पेपर सोडवला, पण त्यातून शिल्लक राहिलेल्या काही अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे शोधण्याची संधी भारतीय संघाला उद्यापासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून मिळणार आहे.

तीन सामन्यांची ही मालिका विश्वकरंडक स्पर्धेपूर्वीच्या तयारीसाठी अखेरची मालिका आहे. त्यामुळे प्रामुख्याने गोलंदाजीतील कमकुवत बाजूवर भारतीयांना आताच उतारा शोधावा लागणार आहे.

डेथ गोलंदाजी (अंतिम षटकांतील) भारतीयांच्या मुळावर येत आहे. त्याचा फटका आशिया करंडक स्पर्धेपासून बसलेला आहे. प्रामुख्याने भुवनेश्वर कुमारची गोलंदाजी फारच महागडी ठरलेली आहे, पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेत त्याला विश्वांती देण्यात आल्यामुळे झाकली मूठ सव्वा लाखाची राहणार आहे. भुवनेश्वर कुमारची विश्वकरंडक स्पर्धेसाठी निवड झालेली आहे, त्यामुळे आता तो प्रत्यक्ष सामन्यांतून डेथ गोलंदाजीचा प्रश्न सोडवण्याऐवजी थेट विश्वकरंडक स्पर्धेतच खेळेल.

विश्वकरंडक स्पर्धेसाठी दीपक चहर आणि महम्मद शमी यांची राखीव गोलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे. शमी कोरोनातून अजून बरा झालेला नाही, त्यामुळे त्याला आपली तयारी दाखवता येणार नाही, परंतु दीपक चहरसाठी ही नामी संधी आहे. अष्टपैलुत्व ही त्याची जमेची बाजू आहे. आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेत प्रभाव पाडला आणि विश्वकरंडक स्पर्धेतील संघातील एखादा गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर गेला, तर चहलला पहिल्या क्रमांकाची पसंती मिळू शकते, त्यामुळे तो या मालिकेत आपले सर्वस्व पणास लावेल.

हार्दिक पंड्याला विश्रांती देण्यात आल्यामुळे दीपक चहरला अंतिम संघात खेळण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल. जसप्रीत बुमरा, हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंग असे तीन विश्वकरंडक स्पर्धेसाठी निवडलेले गोलंदाज आफ्रिकेविरुद्धच्या संघात आहेत. भुवनेश्वरसह हर्षलचीही डेथ ओव्हरमधील गोलंदाजी चिंता करणारी ठरलेली आहे. त्याला सुधारणा करण्यासाठी अजून संधी दिली जाईल, की ऑस्ट्रेलियाविरुद्ध न खेळलेल्या अर्शदीपला अंतिम संघात खेळवले जाईल याचे उत्तर उद्याच मिळेल.

क्षेत्ररक्षणाचा प्रश्न

गेल्या अनेक सामन्यांत भारतीयांचे क्षेत्ररक्षण अपेक्षेएवढे झालेले नाही. सोपे झेल सोडले जात आहेत, त्याचबरोबर मैदानी क्षेत्ररक्षणातही गलथानपणा होत आहे. भारतीयांना आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेतून या कमकुवत बाजूत सुधारणा करावी लागणार आहे.

युझवेंद्र की अश्विन

ऑस्ट्रेलियाविरुद्ध लेगस्पीनर युझवेंद्र चहलला संधी देण्यात आली होती. आता कदाचित अश्विनला सामन्याचा सराव मिळावा म्हणून पसंती दिली जाऊ शकते.

केएल राहुलवर लक्ष

फलंदाजीत रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी चांगली लय मिळवलेली आहे. सलामीवीर केएल राहुल मात्र महत्त्वाच्या सामन्यात आणि ताकदवान प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध अपयशी ठरत आहे. फॉर्मात येण्यासाठी त्यालासुद्धा अखेरची संधी आहे; मात्र त्यासाठी त्याला कागिसो रबाडा आणि नॉर्किया यांचा सामना करावा लागणार आहे.

संघ यातून निवडणार :

  • भारत : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमरा

  • दक्षिण आफ्रिका : तेम्बा बावूमा (कर्णधार), क्विन्टॉन डिकॉक, बॉर्न फॉर्टिन, रेझा हेन्द्रिक्स, हेर्निच क्लासेन, मार्को यान्सेन, केशव महाराज, एडेन मार्करम, डेव्हिड मिलर, लुंगी एन्गिडी, एर्निच नॉर्किया, वेन पार्नेल, एन्डिले फुलुक्वायो, ड्वेन प्रिटोरिस, कागिसो रबाडा, रायली रॉसो, ताब्रेझ शम्सी आणि त्रिस्टन स्टब्स.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: उद्धव ठाकरे नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

म्हणून तुझ्यासोबत कुणी काम करत नाही... अनिल कपूर यांचं नाना पाटेकरांबद्दल थेट वक्तव्य ; म्हणाले- सगळ्यांना मारून

Sambhajinagar: इम्तियाज जलीलांवर ॲट्रोसिटी गुन्हा दाखल; मतदानाच्या दिवशी झाला होता वाद

Imtiaz Jaleel : बूथ कॅप्चर भाजपने केले अन् गुन्हा माझ्यावर कसा? इम्तियाज जलील

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

SCROLL FOR NEXT