India vs Sri Lanka 1st test Day 2 Live Update Score  esakal
क्रीडा

IND vs SL : दुसऱ्या दिवशी भारतीय संघाची सामन्यावर मजबूत पकड

सकाळ डिजिटल टीम

मोहली : भारतीय संघाने उभारलेल्या डोंगराएवढ्या धावसंख्येचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात खराब झालीये. दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने डाव घोषीत केल्यानंतर पाहुण्या संघाने आपल्या पहिल्या डावाला सुरुवात केली. दुसऱ्या दिवसाअखेर त्यांनी 108 धावांत 4 गडी गमावले होते.

रविंद्र जाडेजाच्या नाबाद 175 धावांच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या डावात धावांचा डोंगर उभारला आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानं चहापानापूर्वीच आपला डाव 8 बाद 574 धावांवर घोषीत केला. भारत आणि श्रीलंका ( India vs Sri Lanka) यांच्यातील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी (1st test Day 2) भारतीय संघाने 6 बाद 357 धावांपासून पुढे खेळण्यास सुरूवात केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) 45 धावांवर तर रविचंद्रन अश्विन (R. Ashwin) 10 धावा करून नाबाद होते. पहिला डाव घोषीत केल्यानंर रविंद्र जाडेजा 175 धावांवर नाबाद परतला.

पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताकडून ऋषभ पंत, हनुमा विहारी आणि आपली शंभरावी कसोटी खेळणाऱ्या विराट कोहलीने (Virat Kohli) चांगली फलंदाजी केली. मात्र या पहिल्या दिवशी काही हार्ट ब्रेकिंग घटनाही घडल्या. विराट कोहलीला आपले अर्धशतक पूर्ण करता आले नाही तर ऋषभ पंत आपल्या शतकापासून अवघ्या 4 धावा दूर राहिला.

103-4 : अश्विनच्या खात्यात आणखी एक विकेट, धनंजयाच डिसिल्वा अवघ्या एका धावेवर तंबूत

  • 96-3 : मॅथ्यूजच्या रुपात श्रीलंकेला तिसरा धक्का; बुमराहनं त्याला 22 (39) धावांवर केले पायचित

बुमराहने निसंकाला नो बॉलवर केले बोल्ड

59-2 : जडेजाने सेट झालेल्या करूनारत्नेला दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता

48-1 : अश्विनने लंकेला दिला पहिला धक्का; लाहिरू थिरिमाने 17 धावा करून बाद

भारताने आपला पहिला डाव 574 धावांवर केला घोषित; जडेजा राहिला 175 धावांवर नाबाद

लंचनंतर रविंद्र जडेजाने फिरलवा तुफान दांडपट्टा; नाबाद दीडशतकी खेळीमुळे भारत 550 पार

भारताच्या लंचपर्यंत ७ बाद 468 धावा

जडेजाची 'शतकी' तलवारबाजी; भारताचा धावांचा डोंगर

अश्विनने सोडली जडेजाची साथ; 61 धावा करून झाला बाद

जडेजा पाठोपाठ अश्विननेही ठोकले अर्धशतक

भारत 400 पार तर रविंद्र जडेजाने ओलांडली पंचाहत्तरी

मोहालीवर तलवार सेलिब्रेशन; रविंद्र जडेजाचे दमदार अर्धशतक

भारत 6 बाद 357 धावांपासून पुढे खेळणार; जडेजा 45 तर अश्विन 10 धावांवर आहेत नाबाद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar यांच्यावर टीका का करत नाही? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'मी विचलित...'

Health Tips :  शरीरातील बॅड कोलोस्टेरॉल कमी करायचा आयुर्वेदीक फंडा, भाकरी करण्याआधी इतकच करा

'वक्फ बोर्डाच्या नावाखाली राज्यातील शांतता भंग केल्यास कठोर कारवाई करणार'; गृहमंत्र्यांचा कडक इशारा

बॉक्सर Mike Tyson अन् जॅक पॉलवर कोटींचा वर्षाव; जाणून घ्या संपत्ती किती ?

Swiggy-Zomato: स्विगी, झोमॅटो आणि झेप्टोबाबत देशातील बड्या उद्योगपतीचा इशारा, म्हणाले, भारत हा...

SCROLL FOR NEXT