India vs Sri Lanka 2nd ODI esakal
क्रीडा

IND vs SL 2nd ODI : भारताने श्रीलंकेचा केला 4 विकेट्सनी पराभव; मालिका घातली खिशात

अनिरुद्ध संकपाळ

केएल राहुलची संयमी खेळी, भारताचा विजय 

केएल राहुलने भारताची टॉप ऑर्डर स्वस्तात माघारी गेल्यानंतर 103 चेंडूत नाबाद 64 धावांची अर्धशतकी खेळी करत भारताला विजयापर्यंत पोहचवले. भारताने 44 व्या षटकात श्रीलंकेचे 216 धावांचे आव्हान 6 विकेट्सच्या मोबदल्यात पार केले.

161-5 : पांड्याने राहुलची सोडली साथ

करूणारत्नेने हार्दिक पांड्याला 36 धावांवर बाद करत भारताला पाचवा धक्का दिला. हार्दिक पांड्याला शेवटपर्यंत राहुलची साथ देता आली नाही. मात्र त्याने अर्धशतकी भागीदारी करत भारचाला विजयाचा जवळ पोहचवले.

IND 141/4 (29) : राहुल - पांड्याची झुंजार भागीदारी

भारताची टॉप ऑर्डर ढेपाळल्यानंतर केएल राहुल आणि हार्दिक पांड्या यांनी सावध फलंदाजी करत नाबाद अर्धशतकी भागीदारी रचली. भारताला 150 धावांपर्यंत पोहचवले.

86-4 : श्रेयस अय्यर झाला बाद; भारत अडचणीत 

भारताची अवस्था 3 बाद 62 अशी झाल्यानंतर श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र मात्र रजिथाने 28 धावांवर खेळणाऱ्या अय्यरला बाद करत भारताच्या अडचणीत वाढ केली.

62-3  : लाहुरू कुमाराने उडवला विराटचा त्रिफळा

भारताचे दोन्ही सलामीवीर माघारी गेल्यानंतर गेल्या सामन्यातील शतकवीर विराट कोहलीवर भारातची सर्व मदार होती. मात्र कुमाराने त्याचा अवघ्या 4 धावांवर त्रिफळा उडवत भारताला तिसरा आणि मोठा धक्का दिला.

41-2  : भारताचे दोन्ही सलामीवीर माघारी

विजयासाठी 216 धावांचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाने आपले दोन्ही सलामीवीर 41 धावात गमावले. रोहित शर्मा 17 तर शुभमन गिल 21 धावा करून बाद झाला. रोहितला करूणारत्नेने तर गिलला लाहिरूने बाद केले.

215-10  :अखेर सिराजने शेपूट गुंडाळली.

श्रीलंकेची अवस्था 8 बाद 177 धावा झाली असताना वेलालगे आणि रजिथाने नवव्या विकेटसाठी 38 धावांची भागीदारी रचत संघाला 215 धावांपर्यंत पोहचवले. अखेर 40 व्या षटकात सिराजने दिनुथ वेलालगे 32 धावांवर बाद केले. त्यानंतर लाहिरू कुमाराचा शुन्यावर त्रिफळा उडवत लंकेचा डाव 215 धावात गुडंळला.

152-7 : मलिकने उघडले खाते

श्रीलंकेचे सहा फलंदाज बाद झाल्यानंतर अष्टपैलू वानिंदू हसरंगाने कुलदीपला काही आक्रमक फटके मारत धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याला उमरान मलिकने 21 धावांवर बाद करत त्याचे मनसुबे हाणून पाडले.

126-6 : असलंकही ठरला कुलदीपची शिकार

कुलदीप यादवने चरिथ असलंकाला देखील 15 धावांवर बाद करत आपली तिसरी शिकार केली.

125-5 : धोकादायक दसुनचा कुलदीपने उडवला त्रिफळा

गेल्या सामन्यात शतकी खेळी करून भारतीय गोलंदाजांना चांगल्याच दमवणाऱ्या दसुन शानकाची दुसऱ्या सामन्यात डाळ शिजली नाही. त्याचा कुलदीप यादवने 2 धावांवर त्रिफळा उडवत लंकेची अवस्था 5 बाद 125 धावा अशी केली.

118-4 : पदार्पणात अर्धशतक ठोकणारा फर्नांडो झाला धावबाद 

श्रीलंकेचा सलामीवीर नुवानिदू फर्नांडोने आपल्या पहिल्याच वनडे सामन्यात 62 चेंडूत 50 धावा केल्या. मात्र पुढच्याच चेंडूवर तो धावबाद झाला.

103-3 : कुलदीपने जोडी फोडली. 

श्रीलंकेने पहिल्या पॉवर प्लेमध्ये सावध सुरूवात केली होती. मात्र त्यानंतर कुसल मेंडीस आणि नुवानिदू फर्नांडोने दुसऱ्या विकेटासाठी 73 धावांची भागीदारी रचत लंकेला शतकी मजल मारून दिली. मात्र फिरकीपटू कुलदीप यादवने 34 चेंडूत 34 धावा करणाऱ्या मेंडीसला बाद केले.

पाठोपाठ पुढच्याच शटकात अक्षर पटेलने धनंजया डी सेल्वाचा शुन्यावर त्रिफळा उडवत तिसरा धक्का दिला. यामुळे 1 बाद 102 धावांवरून लंकेची अवस्था 3 बाद 103 धावा अशी झाली.

SL 51/1 (10) : श्रीलंकेचे अर्धशतक पूर्ण 

सावध सुरूवात करणाऱ्या श्रीलंकेने पहिल्या पॉवर प्लेमध्ये 1 बाद 51 धावांपर्यंत मजल मारली.

SL 29/1 (6) : भारतीय गोलंदाजांचा टिच्चून मारा; सिराजने दिला पहिला धक्का

श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर भारतीय गोलंदाजांनी पहिल्या 5 षटकात टिच्चून मारा करत सलामीवीर अविष्का फर्नांडो आणि नुवानिदू फर्नांडो यांना आपले हात खेलण्याची संधी दिली नाही. पदार्पण करणाऱ्या नुवानिदूला 10 चेंडूपर्यंत खाते उघडला आले नव्हते. अखेर सहाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मोहम्मद सिराजने अविष्का फर्नांडोचा 20 धावांवर त्रिफळा उडवत लंकेला पहिला धक्का दिला.

भारतीय संघात एक बदल 

भारताने आपल्या संघात एक बदल केला आहे. गेल्या सामन्यात दुखापत झालेल्या युझवेंद्र चहलच्या ऐवजी चायनामन गोलंदाज कुलदीप यादवला संघात स्थान मिळाले आहे.

श्रीलंकेने नाणेफेक जिंकली

श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंका संघात दोन बदल करण्यात आले आहेत. निसंका आणि मधुशानका दुखापतीमुळे खेळू शकणार नाहीयेत.

India vs Sri Lanka 2nd ODI : कोलकाता येथे खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने श्रीलंकेचा 4 विकेट्सनी पराभव करत मालिकेत 2 - 0 अशी विजय आघाडी घेतली. भारताने श्रीलंकेचे 216 धावांचे आव्हान 6 विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. भारताकडून केएल राहुलने संयमी अर्धशतक (103 चेंडूत नाबाद 64 धावा) करत भारताचा विजय निश्चित केला. भारताकडून हार्दिक पांड्याने देखील 36 धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले.

तत्पूर्वी, भारताने प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेचा 40 षटकात 215 धावात धुव्वा उडवला. भारताकडून मोहम्मद सिराज ने 30 धावात 3 तर कुलदीप यादवने 51 झावाच 3 बळी टिपले. श्रीलंकेकडून पदार्पण करणाऱ्या नुवानिदू फर्नांडोने अर्धशतकी खेळी केली.

भारतासाठी श्रीलंकेची वरची फळी फारशी त्रासदायक ठरत नाही. मात्र लंकेची शेपूट भारतीय गोलंदाजांसाठी जड जाते. पहिल्या सामन्याप्रमाणे दुसऱ्या सामन्यात देखील तळातील फलंदाजांनी झुंजारपणा दाखवत श्रीलंकेला 215 धावांपर्यंत पोहचवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:ठाणे पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवरच

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT