India vs Sri Lanka 2nd Test Virat Kohli Fan invade in ground  esakal
क्रीडा

Video: पोलिसांची 'फिटनेस' टेस्ट घेणाऱ्या विराट चाहत्याची अखेर मानगुट धरलीच

सकाळ डिजिटल टीम

बंगळुरू : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरी कसोटी (India vs Sri Lanka 2nd Test) बंगळुरूच्या चिन्नास्मामी स्टेडियमवर होत आहे. काल कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी 447 धावांचे लक्ष्य ठेवले. भारताचा अव्वल फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) पहिल्या डावात 23 तर दुसऱ्या डावात 13 धावा करून बाद झाला. आरसीबीचे होम ग्राऊंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या चिन्नास्वामी स्डेडियमवर विराट कोहली आपला शतकांचा दुष्काळ संपवेल अशी अपेक्षा चाहत्यांना होती. मात्र ती अपेक्षा काही विराटकडून पूर्ण झाली नाही.

असे असले तरी विराटवरचे बंगळुरूमधील त्याच्या चाहत्यांचे प्रेम (Virat Kohli Fan) तसुभरही कमी झाले नाही. या प्रेमापोटीत कसोटीच्या दुसऱ्या दिवशी विराट चाहत्यांनी मैदानावरील तगडे सुरक्षाकडे भेदले. या चाहत्याने हे सुरक्षाकडे फक्त विराटसोबत सेल्फी घेण्यासाठी भेदले. मात्र यानंतर विराटच्या अनके चाहत्यांनी मैदानात धाव घेतली. त्यामुळे मैदानावरील सुरक्षा रक्षकांची चांगलीच पळापळ झाली. एका चाहत्याने तर पोलिसांना पूर्ण मैदानाचा एक राऊंड त्याच्या मागे पळवले आणि त्यांची जणू फिटनेस टेस्टच घेतली.

ही घटना श्रीलंकेने ज्यावेळी आपला दुसला डाव सुरू केला त्यावेळी घडली. या दुसऱ्या डावाच्या सहाव्या षटकात मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर श्रीलंकेचा फलंदाज कुसल मेंडीस दुखापतग्रस्त झाला. तो मैदानावरच उपचार घेत होता. सामना काही काळ थांबला होता. याचा फायदा उचलत तीन चाहते त्याच्यासोबत जवळून सेल्फी घेण्यासाठी मैदानात धावले. त्यातील एक चाहता विराटजवळ जाण्यात यशस्वी ठरला. विराट कोहली स्लिपमध्ये फिल्डिंग करत होता. या चाहत्याने खिशातील मोबाईल काढून विराटसोबत सेल्फी काढण्याची विनंती केली. तोपर्यंत सुरक्षा रक्षक तेथे आला आणि त्याने या चाहत्याला पकडले.

दरम्यान, दुसरा एक चाहता देखील मैदानात घुसला होता. तो खेळाडूंच्या जवळ पोहचणार तोच पोलिसांनी त्याचा पाठलाग करण्यास सुरूवात केली. या चाहत्याने देखील या पोलिसांना चकवा देत त्यांना संपूर्ण मैदानभर मागून पळायला लावले. चाहत्याचा धावाण्याचा वेग चांगला असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांची चांगलीच पळापळ झाली. अखेर पाच- सहा पोलिस कर्मचाऱ्यांनी या चाहत्याची मानगुट धरलीच. सध्या विराटच्या चाहत्याने पोलिसांचा घेतलेल्या या फिटनेस टेस्टचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सचिन पाटील 13327 मतांनी आघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT