IND vs SL 3rd ODI : मोहम्मद सिराजच्या वादळापुढे लंकेचा डाव पत्त्याच्या बंगल्या प्रमाणे कोसळला. भारताचे 391 धावांचे मोठे आव्हान घेऊन मैदानाच उतरलेल्या लंकाचा संपूर्ण डाव 73 धावात संपुष्टात आला. भारताने सामना 317 धावांनी जिंकत आपला धावांच्या बाबतीतला सर्वात मोठा विजय साजरा केला.
तत्पूर्वी, भारताने श्रीलंकेविरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात 391 धावांचे आव्हान ठेवले. विराट कोहलीच्या दमदार दीडशतकी (110 चेंडूत 166 धावा खेळीच्या जोरावर भारताने 50 षटकात 5 बाद 390 धावांपर्यंत मजल मारली. विराटला शुभमन गिलने 116 धावांची शतकी खेळी करत चांगली साथ दिली. रोहित शर्माने 42 तर श्रेयस अय्यरने 38 धावांचे योगदान दिले.
कुलदीप यादवने लाहिरू कुमाराला 9 धावांवर बाद करत लंकेचा डाव 73 धावात संपुष्टात आणला. भारताने सामना 317 धावांनी जिंकत धावांच्या बाबतीत वनडे क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा विजय साजरा करत विश्वविक्रम स्थापित केला.
श्रीलंकेची टॉप ऑर्डर उडवल्यानंतर सिराज आणि शमीने लंकेची अवस्था 5 बाद 37 धावा अशी केली होती. त्यानंतर सिराजने करूणारत्नेला धावबाद करत लंकेला सहावा धक्का दिला. पाठोपाठ कुलदीप यादवने लंकेचा कर्णधार शानकाला 11 धावांवर बाद केले. शमीनेही दुनिथची शिकार करत लंकेची अवस्था 8 बाद 51 धावा अशी केली.
भारताचे 391 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेची सुरूवात खराब झाली. मोहम्मद सिराजने असलंका फर्नांडोला 1 तर कुसल मेंडीसला 4 धावांवर बाद करत पहिले दोन धक्के दिले. त्यानंतर मोहम्मद शमीने चरिथ असलंकला 1 धावेवर बाद करत लंकेची अवस्था 3 बाद 31 धावा अशी केली. सिराजने लंकेला अवघ्या 4 धावात चौथा धक्का दिला. त्याने नुवानिदू फर्नांडोचा 19 धावांवर त्रिफळा उडवला.
विराट कोहलीने 166 धावांची नाबाद दीडशतकी खेळी करत भारताला 50 षटकात 5 बाद 390 धावांपर्यंत पोहचवले.
विराट कोहलीने आपले वनडेमधील 46 वे शतक ठोकत आपले शतकी मीटर पुन्हा जोमाने सुरू केले. त्याने श्रेयस अय्यरसोबत तिसऱ्या विकेटसाठी नाबाद शतकी भागीदारी रचली.
अखेर रजिथाला शुभमन गिल आणि विराट कोहलीची 131 धावांची भागीदारी तोडण्यात यश आले. रजिथाने 97 चेंडूत 116 धावांची शतकी खेळी करणाऱ्या गिलचा त्रिफळा उडवला.
शुभमन गिलने आपल्या वनडे कारकिर्दितील दुसरे शतक ठोकत भारताला 200 पार पोहचवले. त्याला साथ देणाऱ्या विराट कोहलीने देखील अर्धशतकी खेळी केली. या दोघांनी 100 चेंडूत नाबाद 125 धावांची भागीदारी रचली.
सलामीवीर शुभमन गिलने विराट कोहली सोबत दुसऱ्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी रचत संघाला 25 षटकातच 150 च्या पार पोहचवले.
भारताचा सलामीवीर शुभमन गिलने आपले वनडेतील सातवे अर्धशतक पूर्ण केले. याचबरोबर भारतानेही शतकी मजल मारली.
पुन्हा एकदा भारताच्या कर्णधाराला चांगल्या सुरूवातीनंतर मोठी खेळी करण्यात अपयश आले. शुभमन गिलसोबत 95 धावांची सलामी दिल्यानंतर करूणारत्नेने रोहितला 42 धावांवर बाद करत ही जोडी फोडली.
भारतीची सलामी जोडी रोहित शर्मा आणि शुभमन गिलने दमदार सलामी देत भारताला 13 व्या षटकात 86 धावांपर्यंत पोहचवले. शुभमन गिल आपल्या अर्धशतकाच्या जवळ पोहचला आहे.
भारातने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने आपल्या संघात दोन बदल केले असून टी 20 संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याला रोहित शर्माने विश्रांती देत उपकर्णधार सूर्यकुमार यादवला संधी दिली आहे. तसेच उमरान मलिकला देखील विश्रांती देऊन अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला संधी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.