India vs Sri Lanka T20 ODI Series Full Schedule : भारतीय टी 20 संघाचा चेहरा मोहरा आणि नेता देखील बदल्यानंतर आता त्यांचे टेस्टिंग होणे गरजेचे आहे. हे टेस्टिंग येत्या 3 जानेवारीपासून आशिया कप विजेत्या श्रीलंकेसोबत होणार आहे. आशिया कपमधील विजयानंतर श्रीलंकेला हलक्यात घेऊन चालणार नाही.
दुसरीकडे टी 20 संघाचा नवा गडी हार्दिक पांड्या आपल्या नव्या दमाच्या मावळ्यांसह आपली मोहीम नव्या वर्षात सुरू करत आहे. भारत मायदेशात श्रीलंकेविरूद्ध तीन टी 20 आणि तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. टी 20 मालिका ही हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात तर वनडे मालिका रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळली जाणार आहे. टी 20 मालिकेत रोहित, राहुल अन् विराट देखील नसणार आहे. त्यामुळे हार्दिकच्या संघाचा कस लागण्याची शक्यता आहे.
भारत विरूद्ध श्रीलंका टी 20 मालिका
पहिला टी 20 सामना, 3 जानेवारी, मुंबई - रात्री 7 वाजता
दुसरा टी 20 सामना, 5 जानेवारी, पुणे - रात्री 7 वाजता
तिसरा टी 20 सामना, 7 जानेवारी, राजकोट - रात्री 7 वाजता
भारत विरूद्ध श्रीलंका ODI मालिका
पहिला ODI सामना, 10 जानेवारी, गुवाहाटी - दुपारी 1.30 वाजता
पहिला ODI सामना, 12 जानेवारी, कोलकाता - दुपारी 1.30 वाजता
पहिला ODI सामना, 15 जानेवारी, तिरूवअनंतपुरम - दुपारी 1.30 वाजता
भारताचा टी 20 संघ
हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार
भारताचा ODI संघ
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग
हेही वाचा : Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.