Jason Holder Sakal
क्रीडा

IPL Auction च्या मोक्यावर चौका; होल्डरचा '440 करंट'चा झटका

सुशांत जाधव

India vs West Indies, 3rd ODI : भारता विरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात कॅरेबियन अष्टपैलू जेसन होल्डरने (Jason Holder) विकेट्सचा चौकार मारला. तळाच्या फलंदाजीत मोक्याच्या क्षणी बहरणारी जोडी फोडत त्याने 4 विकेट्स घेतल्या. या आधी 2018 मध्ये त्याने वनडेत 4 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर आता आयपीएलच्या मेगा लिलावापूर्वी (IPL Mega Auction) त्याने लक्षवेधी कामगिरी करुन दाखवली आहे. (India vs West Indies 3rd ODI Jason Holder ODI 4 wicket before IPL Mega Auction)

वेस्ट इंडीजच्या (West Indies) संघाने मालिका गमावली असली तरी होल्डरची ही कामगिरी संघाला समाधान देणारी आहे. याशिवाय आयपीएल फ्रँचायजींनाही आपल्या गोलंदाजीनं प्रभावित केले आहे. आयपीएलच्या मेगा लिलावात वेस्ट इंडीजचे अनेक खेळाडू फ्रँचायझींना खुणावत असतील. त्यात अल्झारी जोसेफ आणि जेसन होल्डर या खेळाडूंच्या नावाचा समावेश आहे. अष्टपैलूंच्या यादीत जेसन होल्डरला चांगली किंमत मिळू शकते.

जेसन होल्डरनं 8 षटकात 34 धावा खर्च करुन 4 विकेट्स घेतल्या. गोलंदाजीनंतर आता फलंदाजीतही त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. आयपीएलच्या मेगा लिलावात जेनस होल्डरच्या नावाचा समावेश आहे. त्याची मूळ किंमत 1.5 कोटी इतकी आहे. (Jason Holder (West Indies, Base price: 1.5 crore) परदेशी खेळाडूतील अष्टपैलूंमध्ये त्याला चांगला भाव मिळू शकतो. तो एक लढवय्या खेळाडू आहे.

इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सामन्यात त्याने दमदार कागिरीनं लक्ष वेधलं होते. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात त्याला मोईन अलीने चार चेंडूवर चार षटकार खेचले होते. यातून कमबॅक करत त्याने चार चेंडूत चार विकेट घेत हॅटट्रिक नोंदवली होती. वनडेत त्याने जवळपास तीन वर्षानंतर चार विकेट घेतल्या आहेत. मोक्याच्या क्षणी फलंदाजीत मोठी फटकेबाजी करण्यातही तो माहीर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पारा घसरला; आजपासून थंडीचा जोर वाढणार

Rahul Gandhi : मोदींचा डोळा राज्याच्या संपत्तीवर...राहुल गांधी यांचा भाजपवर घणाघात

Anil Deshmukh: अनिल देशमुखांवर हल्ला कसा झाला, नेमकं काय घडलं? हल्लेखोर देत होते भाजप जिंदाबादच्या घोषणा? मोठा रिपोर्ट समोर

Sakal Podcast: युक्रेनला क्षेपणास्त्र वापरण्याची अमेरिकेनं दिली परवानगी ते बाबा सिद्दीकी हत्येतील मास्टरमाईंडला अटक

थंडीत उर्जा रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आहारात काय असावे? ‘हे’ ७ पदार्थ आहारात ठेवा, होतील फायदेच फायदे

SCROLL FOR NEXT