india wins asia cup SAKAL
क्रीडा

Asia Cup 2022: आशिया चषक जिंकणारे भारतीय कर्णधार

आतापर्यंत तब्बल सातवेळा भारताने आशिया चषकावर आपले नाव कोरले आहे

Kiran Mahanavar

India Wins Asia Cup : आशिया चषक येत्या 27 ऑगस्टपासून यूएईमध्ये स्पर्धेला सुरुवात होईल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा पहिलाच सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार आहे. आतापर्यंत तब्बल सातवेळा भारताने आशिया चषकावर आपले नाव कोरले. विशेष म्हणजे 2016 आणि 2018 चा आशिषा चषक पटकावलेल्या भारतीय संघाला यंदा विजेतेपदाच्या हॅटट्रिकची संधी आहे. 1984 ला सर्वप्रथम सुनील गावसकरांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा भारताने जिंकली होती. तर 2018 च्या विजेतेपदावेळी रोहित भारताचा कर्णधार होता. एक नजर आशिया चषक जिंकून देणाऱ्या भारतीय कर्णधारांवर...

india wins asia cup 1984 in sharjah in gavaskar captaincy

आशिया चषक स्पर्धेला 1984 ला सुरुवात झाली. सुनील गावसकर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने अंतिम सामन्यात श्रीलंकेला नमवत पहिले विजेतेपद आपल्या नावे केले.

Dilip Vengsarkar in 1988 Asia Cup 1988

1988 पुन्हा श्रीलंकेलाच हरवत भारताने दुसऱ्यांदा आशिया चषक जिंकला. यावेळी दिलीप वेंगसरकर भारताचे कर्णधार होते.

Mohammad Azharuddin 1991 Asia Cup

कर्णदार मोहम्मद अझरुद्दीनच्या जोरावर भारताने अंतिम सामन्यात तिसऱ्यांदा श्रीलंकेला पराभूत केले आणि 1991 साली तिसऱ्या आशिया चषकांवर मोहोर उमटवली. त्यानंतर 1995 साली याच कामगिरीची पुनरावृत्ती करत अझरहने पुन्हा श्रीलंकेला पराभूत केले आणि चौथ्यांदा आशिया चषक जिंकला.

Mahendra Singh Dhoni in 2010 and 2016 Asia Cup

यावेळी मात्र भारताला तब्बल 15 वर्षे विजेतेपदासाठी प्रतिक्षा करावी लागली. 2010 ला अंतिम सामन्यात परत श्रीलंकेला भारताचे आव्हान पेलवले नाही आणि पाचव्यांदा त्यांनी आशिया चषक धोनीच्या भारतीय संघाला बहाल केला. 2016 ला पहिल्यांदाच टी-20 प्रकारात झालेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी नवा होता. धोनीच्या नेतृत्वात संपूर्ण स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या भारताने अंतिम सामन्यात बांगलादेशवर विजय मिळवत सहाव्यांदा विजेतेपद पटकावले.

Rohit Sharma in 2018 Asia Cup

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर आली आणि त्याने लौकिकाला साजेशी कामगिरी करत भारताला सातवा आशिया चषक जिंकून दिला. यावेळी पुन्हा भारताने बांगलादेशाला धूळ चारली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Mohammad Shami ने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ठोकली दावेदारी; गोलंदाजीनंतर फलंदाजीतही दाखवली चमक

Goa Tourism : जाऊ फुलपाखरांच्या गावा! गोव्यात बटरफ्लाय कंझर्व्हेटरीला नक्की भेट द्या, फि,वेळ आणि ठिकाण जाणून घ्या सर्वकाही

Vinod Tawde : अजित पवारांना सोबत घेतल्याचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्टच सांगितले कारण...

Vinod Tawde: पुन्हा शरद पवार पावसात भिजले; भाजपचे तावडे म्हणाले, हा जिंकण्याचा 'भ्रम'...

SCROLL FOR NEXT