womens cricket file photo
क्रीडा

AUSW vs INDW : महिला क्रिकेटमध्ये अस्तित्वाची 'डिमांड'

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय महिला संघ एक दिवसरात्र कसोटी सामना, तीन एकदिवसीय आणि तीन टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.

सुशांत जाधव

ऑस्ट्रेलिया आणि भारत पुरुष क्रिकेट संघातील मालिका ही बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) नावाने खेळवण्यात येते. अगदी त्याच धर्तीवर ऑस्ट्रेलिया आणि भारत महिला क्रिकेट मालिकेलाही (India Women vs Australia Women) दिग्गज महिला क्रिकेटर्सच्या नावाने ओळख द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या सदस्य आणि माजी क्रिकेटर मेल जोन्स (Mel Jones) यांनी यासंदर्भात भूमिका मांडली आहे.

भारतीय महिला संघ सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय महिला संघ आपला पहिला पिंक बॉल टेस्ट सामना खेळणार आहे. भारतीय महिला संघाच्या ऐतिहासिक क्षणाच्या दौऱ्याची घोषणा झाल्यानंतर जोन्स यांनी ही मागणी केली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय महिला संघ एक दिवसरात्र कसोटी सामना, तीन एकदिवसीय आणि तीन टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. (India Women vs Australia Women Mel Jones Demands A Trophy Named After Legends Like The Border Gavaskar Trophy)

'क्रिकेट.कॉम.एयूने जोन्स यांचा दाखला देऊन दिलेल्या वृत्तानुसार, "बॉर्डर-गावसकर ट्रॉफीप्रमाणे महिला क्रिकेटमध्येही काहीतरी जबरदस्त पाहायला मिळायला हवे. भूतकाळात जे काही झाले ते पुरुषांच्या नजरेतून होते. त्यामुळे आता आपल्याला महिलांच्या नजरेतून काही गोष्टी करायला हव्यात. पुरुष आणि महिला संघाच्या दरम्यान होणारी अ‍ॅशेस मालिकेसंदर्भात अनेक प्रेरणादायी गोष्टी आहेत. याप्रमाणेच आपण आणखी काही खास गोष्टी करु शकतो. आपण जसे अ‍ॅशेज मालिकेची चर्चा करतो तशीच याचीही पुढील शंभर वर्षे चर्चा होईल, असे जोन्स यांनी म्हटले आहे.

ऑस्‍ट्रेलियाकडून 5 कसोटी आणि 61 वनडे आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या 48 वर्षीय जोन्स म्हणाल्या की, भारत-ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेटचा इतिहासाला उजाळा देण्यासाठी ट्रॉफीला विशेष नाव देणे रंजक ठरेल. ट्रॉफीला भारताच्या माजी क्रिकेटर शांता रंगास्वामी आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटर मारग्रेट जेनिंग्स यांच्या नावही त्यांनी सुचवले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून पोल घेऊन यासंदर्भात अंतिम निर्णय घेता येईल, असा सल्लाही त्यांनी दिलाय.

भारत आणि ऑस्‍ट्रेलिया महिलांच्यातील पहिला कसोटी सामना जानेवारी 1977 मध्ये वाका येथे खेळवण्यात आला होता. यजमानांनी हा सामना 147 धावांनी जिंकला होता. या सामन्यात भारताकडून शांता रंगास्वामी तर ऑस्ट्रेलियाकडून मारग्रेट यांनी कॅप्टन्सी केली होती. 1978 मध्ये दोन्ही महिला संघातील पहिला वनडे सामना पटनाच्या मैदानात रंगला होता. हा सामनाही ऑस्ट्रेलियाने 71 धावांनी जिंकला. या सामन्यात ऑस्‍ट्रेलियाचे नेतृत्व हे मारग्रेट यांनीच केले होते तर भारताच्या नेतृत्वाची धूरा डायना एडल्जी यांनी सांभाळली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT