India Women vs Australia Women: भारतीय महिला संघ सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. 21 सप्टेंबरपासून तीन सामन्यांच्या वनडे मालिकेनं भारतीय महिला संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होणार आहे. त्यानंतर एकमेव आणि ऐतिहासिक डे नाईट कसोटी सामना नियोजित असून तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेनं भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सांगता करेल.
मागील वर्षी टी-20 वर्ल्ड कपनंतर भारतीय महिला संघ पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन महिला संघाविरुद्ध खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. ऑस्ट्रेलियाला भिडण्यापूर्वी भारतीय संघाची स्फोटक फलंदाज स्मृती मानधनाने (Smriti Mandhana) ऑस्ट्रेलियन महिला संघाविरुद्ध डरकाळी फोडली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना पूर्वी झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही. आत्ताचा संघ पूर्वीच्या संघाच्या तुलनेत अधिक सक्षम असून कांगारूंना त्यांच्या मैदानात पराभूत करुन दाखवण्याची क्षमता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या खेळाडूंमध्ये आहे, असे स्मृती मानधनाने म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यानंतर अनिवार्य क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केल्यानंतर भारतीय महिला संघातील खेळाडूंनी सरावाला सुरुवात केली आहे. स्मृति मानधनाने (Smriti Mandhana)‘द स्कूप पॉडकास्ट’ शी संवाद साधला. यावेळी तिने ऑस्ट्रेलियात धमाका करण्यासाठी उत्सुक असल्याचे बोलून दाखवले.
ती म्हणाली की, 'मेलबर्नमध्ये झालेल्या टी 20 वर्ल्ड कप फायनलनंतर भारतीय महिला संघात खूप सुधारणा झाली आहे. कोरोनामुळे भारतीय महिला संघातील खेळाडू बराच काळ क्रिकेटच्या मैदानापासून दूर होत्या. संघातील प्रत्येक खेळाडूने ब्रेकच्या काळात कठोर मेहनत घेतली असून उणीवा भरुन काढल्या. संपूर्ण संघाने फिटनेस आणि तांत्रिक गोष्टीवर भर दिला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दमदार कामगिरी करु असा विश्वास तिने व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.