मुंबई : इंग्लंडच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात लढत तोकडी पडलेल्या भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने प्रामुख्याने गोलंदाजांना दोषी धरले. ठरलेल्या रणनीतीनुसार त्यांनी गोलंदाजी केली नाही; परंतु संघात नवे गोलंदाज आहेत आणि टी-२० विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी असा अनुभव मोलाचा असल्याचेही मत तिने मांडले.
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या पहिल्या सामन्यात श्रीयांका पाटील आणि साकिया इशाकी या फिरकी गोलंदाजांनी पदार्पण केले. रेणुका सिंगचा अपवाद वगळता इतर सर्व गोलंदाजांनी निराशा केली. याचा फायदा घेत इंग्लंडने २० षटकांत १९७ अशी भक्कम धावसंख्या उभारली होती. या आव्हानासमोर भारताला ६ बाद १५९ धावाच करता आल्या.
सामन्याअगोदर गोलंदाजीसाठी आखलेल्या रणनीतीची अंमलबजावणी झाली नाही. संघातील गोलंदाज नव्या आहेत, लवकर शिकण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे आणि अशा सामन्यातून त्यांना चांगला अनुभव मिळेल, आता पुढच्या सामन्यात आम्हाला गोलंदाजीत सुधारणा करावी लागेल, असे हरमनप्रीतने सांगितले.
हरमनप्रीतने गोलंदाजांना काही प्रमाणात दोषी धरले असले तरी शेफाली वर्माचा अपवाद आणि स्वतःसह रिचा घोषच्या काही प्रमाणातील योगदान वगळता इतर फलंदाजांनी निराशाच केली. शेफालीने ४२ चेंडूत ५२ धावा फटकावल्या, पण अनुभवी स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्ज एकेरी धावात बाद होणे भारताला महागात पडले.
स्मृती आणि जेमिमापाठोपाठ बाद झाल्यावर शेफालीस रिचा आणि मी स्वतः डाव सावरला होता, आव्हान कायम ठेवले होते; परंतु अखेरच्या दहा षटकांत आमची लढत तोकडी पडत गेली. आम्ही क्षमतेनुसार खेळ केला नाही, आता पुढच्या सामन्यांत सकारात्मक दृष्टिकोनातून खेळ करावा लागेल, असे हरमनप्रीतने सांगितले.
महिला संघाचे नवे प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांनी सामन्याअगोदर झालेल्या पत्रकार परिषदेत आपल्या संघाला तंदुरुस्ती, तसेच क्षेत्ररक्षणात चपळता दाखवावी लागेल, असे मत व्यक्त केले होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.