India Won 2013 ICC Champions Trophy MS Dhoni Became First Captain in Men Cricket to Win All Three ICC Trophies in Limited Overs Cricket 
क्रीडा

'एकमेवाद्वितीय धोनी' : आजच्या दिवशीच रचला होता इतिहास

कॅप्टन कूल म्हणजेच महेंद्रसिंग धोनी हा जगातील एकमेव कर्णधार आहे ज्याने तीनही मोठ्या ICC स्पर्धा जिंकल्या आहेत.

Kiran Mahanavar

आजच्याच दिवशी म्हणजे 23 जूनला यजमान इंग्लंडला त्याच्या घरी पराभूत करून धोनीने जागतिक क्रिकेटमध्ये इतिहास रचला होता. ICC चॅम्पियन्स ट्रॉफीवर कब्जा करून तिसरे आयसीसी विजेतेपद पटकावले होते. आजपर्यंत जागतिक क्रिकेटमध्ये कोणत्याही असा कर्णधार झाला नव्हता. धोनीच्या नेतृत्वाखाली 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यापूर्वी टीम इंडियाने 2011 एकदिवसीय विश्वचषक आणि 2007 टी-20 विश्वचषक जिंकला होता.

2013 ची चॅम्पियन्स ट्रॉफी 50 षटकांची खेळली जात असली तरी, इंग्लंडविरुद्धचा अंतिम सामना पावसाच्या व्यत्ययामुळे 20 षटकांचा झाला होता. अॅलिस्टर कुकने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडियाला 20 षटकांत केवळ 129 धावा केल्या. भारताकडून सर्वाधिक कोहलीने 43 धावांची खेळी केली.

एजबॅस्टन मैदानावर या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना यजमानांनी 46 धावांत 4 विकेट गेल्या होत्या, परंतु त्यानंतर इऑन मॉर्गन आणि रवी बोपारा यांनी भारतीय गोलंदाजांना मैदानात उतरवून जोरदार समाचार घेतला. त्यानंतर धोनीचा मास्टर स्ट्रोक चालला आणि 18 व्या षटकात इशांत शर्माने खेळ बदला. त्याआधी इशांत चांगलाच महागात पडला होता. या षटकात इशांतने मॉर्गन-बोपारा या दोन्ही फलंदाजांना बाद करत इंग्लंडच्या तोंडचा घास पळवला. भारताने हा सामना 5 धावांच्या फरकाने जिंकला आणि धोनीचे नाव इतिहासाच्या पानात नोंदवले गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT