Gold Medal To Bronze Medal: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या बहीणभावाने सुवर्णपदक जिंकले आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेत तनुष कोटियन ५ विकेट्स घेत मुंबई संघासाठी बनला संकट मोचक. आणखी एका दिवसाचा खेळ बाकी असून मुंबईला जिंकण्यासाठी २२० धावांची गरज आहे. इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी माजी कर्णधार बाबर आझम व शाहिन आफ्रिदीला पाकिस्तान संघातून वगळण्यात आले आहे. अहिका मुखर्जी आणि सुतिर्था मुखर्जी या भारताच्या महिला दुहेरी जोडीने आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत पहिले महिला दुहेरी कांस्यपदक जिंकले आहे...आजच्या दिवसभरातील क्रीडा विश्वातील टॉप १० बातम्या जाणून घेऊया..
Asian Table Tennis Championships: अहिका मुखर्जी आणि सुतिर्था मुखर्जी या भारताच्या अव्वल मानांकित महिला दुहेरी जोडीने कझाकस्तानमध्ये झालेल्या आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत ऐतहासिक कामगिरी केली आहे. या स्पर्धेत त्यांनी भारतासाठी पहिले महिला दुहेरी कांस्यपदक जिंकले व या स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला दुहेरी जोडी बनली आहे. सविस्तर बातमीसाठी क्लिक करा.
Mahela Jayawardene Head Coach of MI: पाच वेळा आयपीएल विजेतेपद पटकावलेल्या मुंबई इंडियन्सने आज श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धनेची मुख्य प्रशिक्षक म्हणून पुन्हा नियुक्ती केली आहे. जयवर्धने यापूर्वी २०१७ ते २०२२ दरम्यान मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली मुंबईने ३ वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे.सविस्तर बातमीसाठी क्लिक करा.
Commonwealth Games: दक्षिण आफ्रिकेतील सन सिटी येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पॉवरलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राच्या जोडीने विजयी कामगिरी केली आहे. हडपसरच्या चिंतामणी व कादंबरी राऊत या बहीणभावाने या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. जगभरातील एकूण ९७ देश सहभागी झालेल्या स्पर्धेत या बहीणभावाच्या जोडीने आपला ठसा उमटवला व देशाची आणि महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे.सविस्तर बातमीसाठी क्लिक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.