All Indian Batsmen Out In Same Manner Virat Kohli Cheteshwar Pujara esakal
क्रीडा

भारतीय फलंदाजांनी १४५ वर्षात झाले नाही ते करुन दाखवले

अनिरुद्ध संकपाळ

केपटाऊन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तीन सामन्यांची कसोटी मालिका १ -१ अशी बरोबरीत आली आहे. त्यामुळे तिसरी कसोटी मालिकेचा विजेता निश्चित करणार आहे. या निर्णायक कसोटीत (Cape town Test) भारताने पहिल्यांदा फलंदाजी करत फारशी चमक दाखवली नाही. विराट कोहलीच्या ७९ धावांच्या जोरावर भारताने २२३ धावा केल्या. तर दुसऱ्या डावातही ऋषभ पंतच्या शतकी खेळीमुळे भारत १९८ धावांपर्यंत मजल मारु शकला. भारताच्या इतर फलंदाजांनी (Indian Batsmen) फारशी चकम दाखवली नसली तरी त्यांनी तिसऱ्या कसोटी एक विश्वविक्रम (World Record) करुन दाखवला. कसोटी क्रिकेट (Test Cricket) इतिहासात १४५ वर्षात जे घडले नाही ते भारतीय फलंदाजांनी करुन दाखवले. ( All Indian Batsmen Out In Same Manner in Cape town Test)

भारताने (India) तिसऱ्या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा पहिला डाव २२३ धावात संपुष्टात आला. विशेष म्हणजे या डावात भारताचे सर्व १० फलंदाज हे झेलबाद झाले. दुसऱ्या डावातही भारताला फारशी चांगली फलंदाजी करता आली नाही. भारताचा संपूर्ण संघ १९८ धावात पॅव्हेलियनमध्ये परतला. याही डावात भारताचे सर्व फलंदाज झेलबाद होऊन माघारी परतले.

कसोटी क्रिकेट इतिहासातील (Test Cricket History) पहिला कसोटी सामना हा १८७७ मध्ये ऑस्ट्रेलिया (Australia) आणि इंग्लंड (England) यांच्यात खेळला गेला होता. हा पहिला कसोटी सामना मेलबर्नमध्ये झाला होता. यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता. तेव्हापासून कसोटी सामन्यात एका संघाचे दोन्ही डावात सर्व फलंदाज एकाच प्रकारे बाद झालेले नव्हते. मात्र हा विश्वविक्रम भारतीय फलंदाजांनी केपटाऊन कसोटीत करुन दाखवला.

केपटाऊन कसोटी (Cape town Test) रंगतदार स्थितीत पोहचली आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २१२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. तिसऱ्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेने २ बाद १०१ धावांपर्यंत मजल मारली होता. आता चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेला (South Africa) १११ धावा करायच्या आहेत तर भारताला आफ्रिकेच्या ८ विकेट्स घ्यायच्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT