Cricket Pitch  Sakal
क्रीडा

डोन्ट व्हरी! ती आपल्यालाही साथ देईल...

सुशांत जाधव

हेडिंग वाचल्यानंतर ती कोण असा प्रश्न तुम्हाला कदाचित नक्की पडला असेल. या स्पेशल ब्लॉगमध्ये आपण जिच्याबद्दल बोलणार आहोत ती मूडी आहे. अगदी एखाद्या गर्लफ्रेंडसारखी. आता तुम्ही म्हणाल मी गर्ल्डफ्रेंड मूडी असते असा दावा करतोय? या प्रश्नाच उत्तर एखादा बॉयफ्रेंडच चांगल्या पद्धतीने देऊ शकतो. मला विचाराल तर जी मूडी नसते ती फक्त फ्रेंड असू शकते गर्ल्डफ्रेंड अजिबात नाही असच उत्तर तुम्हाला मिळेल. आता यातही प्रकार असतात. त्यातला पहिला प्रकार उसळी घेणारा... दुसरा प्रकार जिचा मूड स्विंग होईल हे कळतही नाही असा. आणि तिसरा प्रकार फिरकी घेणारा.... आपण जिच्याबद्दल बोलणार आहोत ती कॉम्बो इम्पॅक्टवाली आहे. ती कधी उसळी घेऊन गार करते तर कधी स्विंगनं आवाक् करते....

मित्रहो...आपण जिच्याबद्दल बोलतोय ती आहे रंग बदलणारी खेळपट्टी. (Cricket pitch) जी फलंदाजाला नाचवते अन् गोलंदाजांवर भरभरुन प्रेम करते. मी तुम्हाला पहिल्यांदाच तीन प्रकार सांगितले आहेत. यातील पहिला प्रकार हा उसळी घेणारा. ज्या मैदानातील खेळपट्टीवर उसळी घेणाऱ्या चेंडूवर फलंदाजाचा कसं लागतो त्या प्रामुख्याने आपल्याला ऑस्ट्रेलियात भेटतात. ज्याला चेंडू उत्तमरित्या सोडता येतो तो त्या खेळपट्टीवरही उत्तमपद्धतीनं रोमान्स करु शकतो.

दुसरा प्रकार आहे तो स्विंगची जादू दाखवणारा. या खेळपट्टीवरील खेळ हा प्रेमात पडणाऱ्या मजनूला लैलाच्या मनात काय चाललयं याचा मागोवा घेण्यासाठी क्षणाक्षणासाठी कसरत करायला लावण्यातला प्रकार असतो. तुम्हाला तिच्याबद्दल जे वाटत असते अगदी त्याच्या विपरीत काहीतही घडतं आणि तुम्ही क्लिन बोल्ड होता. सांगण्याचा अर्थ बॅट्समनला वाटत असतं चेंडू बाहेर जातोय आणि तो आत येतो आणि दांड्या उडवून जातो. किंवा कधीकधी त्याला वाटतं चेंडू आत येतोय म्हणून तो खेळण्याचा प्रयत्न करतो आणि स्लिपमध्ये झेल देऊन तंबूत परततो. चेंडू बाहेर जाणार आहे हे त्याच्या लक्षातच येत नाही. खेळपट्टीचा हा रंग आपल्याला इंग्लंडमधील खेळपट्ट्या दाखवून देतात.

जहाँ डाल डाल पर सोने की चिडिंयाँ करती है बसेरा...त्या देशात अर्थात आपल्याकडे जिची चलती आहे ती फिरकीची राणीच. भारतातील खेळपट्ट्या या फिरकी घेणाऱ्या असतात. चेंडू पडतो कुठं आणि वळतो कुठं हे ओळखायला जो चुकतो तो आयुष्यातनं उठतो. मग तो कितीही भारी असो. त्याचा निभाव इंथ लागत नाही. यावर बोलण्यासारखं खूप आहे. सध्याच्या घडीला आपला फोकस जिच्यावर आहे ती ही नव्हेच.

आपला लक्ष आहे ते कधी उसळी घेऊन गार करणाऱ्या अन् कधी स्विंगन आवाक् करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेतील खेळपट्टीवर. (South Africa Cricket Pitch) भारतीय संघ दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात 202 धावांत आटोपला. भारतीय फलंदाजी फोल ठरली हे मथळे ज्यांनी लिहिले त्यांची किव येते. कारण त्यांना खेळपट्टीचा रंग आणि रुपच माहित नाही. दक्षिण आफ्रिकेतील खेळपट्टीव चेंडू उसळी कधी घेईल आणि तो झापकन् आत कधी येईल काहीच नेम नसतो. त्यामुळेचं इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियापेक्षा या खेळपट्टीवर खेळणं मुश्किल असते. भारतीय संघाला 23 वर्षांत इथं एकही मालिका जिंकता आली नाही ते यामुळेच.

पण वेळ बदललीये. सचिन आउट झाला की मॅच संपली. हा काळ संपलाय. आज विराट कोहली आणि रोहित शर्माशिवाय आम्ही मॅच जिंकू शकतो आणि त्यात गोलंदाज आमचे मॅच विनर ठरु शकतात हा कॉन्फिडन्स आम्ही कमावलाय. त्यामुळे 23 वर्षांत जे झालं नाही ते दक्षिण आफ्रिकेत आम्हाला नक्की पाहायला मिळेल. ज्या खेळपट्टीनं आमच्या फलंदाजांना नाचवलं ती आमच्या गोलंदाजांवरही प्रेम करेल. नव्हे तिला प्रेम करायला भाग पाडतील असे गडी आमच्याकडे आहेत. बुमराह, शमी आणि नवखा शार्दूलचा रोमान्स प्रत्येक भारतीयाला प्रेमात पाडेल. सिराजही त्यांना उत्तम साथ देईल. जी खेळपट्टी जलदगती गोलंदाजांवर मेहरबान होते ती आपल्या अश्विनवरही फिदा होईल आणि विराट रोहितच्या अनुपस्थित नवा इतिहास रचला जाईल, असा तर्क लावण एकतर्फी वाटत नाही. यातून विरह न येवो हिच ईच्छा बाकी अजून खेळ बाकी आहे याच रिदममध्ये पुन्हा भेटू.... (Indian Cricket Team South Africa Tour And Cricket Pitch Conditions )

सुशांत जाधव

Email - sushant.jadhav@esakal.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT