Rishabh Pant Accident : भारताचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंतची बीएमडब्ल्यू कार दिल्ली-डेहराडून हायवेवर शुक्रवारी रोड डिव्हायडरला धडकली, या अपघातात पंतला अनेक दुखापती झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पंत रुरकी येथे त्याच्या घरी जात असताना ही घटना घडली.
या अपघातानंतर त्याला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. पंतच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला दुखापत झाली असली तरी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.दिल्ली नरसन सीमेवर कार दुभाजकाला धडकली तेव्हा पंत स्वतः गाडी चालवत होता.
ऋषभ पंतच नव्हे तर जागतिक क्रिकेटमध्ये असे अनेक क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी मृत्यूला जवळून पाहिले आहे. या भीषण अपघातात या क्रिकेटपटूंचे प्राण थोडक्यात बचावले. आज आपण अशाच काही क्रिकेटपटूंवर एक नजर टाकूयात.
मोहम्मद शमी 2018 साली डेहराडूनहून नवी दिल्लीला येत असताना कार अपघाताचा बळी ठरला होता. त्या अपघाताच्या वेळी शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ यांच्यात वाद सुरू होता. या अपघातातून सावरत शमीने मैदानावर पुन्हा शानदार पुनरागमन केले.
करुण नायर
करुण नायरचा जुलै 2016 मध्ये अपघात झाला होता. करुण नायर केरळमध्ये सुट्टी घालवत असताना हा अपघात झाला होता. करुण आपल्या नातेवाईकांसह पंपा नदी ओलांडून बोटीने अरनमुला मंदिरात जात होता, मात्र बोटीला अपघात झाला आणि करुणला काही अंतर पोहत जावे लागले. मात्र, आजूबाजूच्या ग्रामस्थांनी त्याला वाचवले.
निकोलस पूरन
वेस्ट इंडिजचा निकोलस पूरन जानेवारी 2015 मध्ये एका भीषण अपघाताचा बळी ठरला होता. यानंतर निकोलस पूरनला चालताही येत नव्हते. निकोलस पूरन याच्या दोन पायांवर शस्त्रक्रिया करावी लागली. निकोलस पूरन याला अनेक महिने व्हीलचेअरवर राहावे लागले होते.
ओशाने थॉमस
फेब्रुवारी 2020 मध्ये वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज ओशाने थॉमसचा जमैकामध्ये मोठा अपघात झाला होता. या अपघातात थॉमस यांची कार पलटी झाली होती. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी ओशाने थॉमस याला घरी आराम करण्याचा सल्ला दिला होता.
ब्रूस फ्रेंच
1987-88 च्या पाकिस्तान दौऱ्यावर सराव करताना बॉल परत करत असताना गर्दीतील एका प्रेक्षकाने ब्रूस फ्रेंचच्या डोक्यात बॉल फेकून मारला होता. यानंतर ब्रूस फ्रेंचला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. ब्रूस फ्रेंच हॉस्पिटलच्या दारात असताना त्याच्या कारला अपघात झाला. यानंतर, ब्रूस हॉस्पिटलमध्ये असताना रुग्णालयाच्या खोलीत त्याच्या डोक्यावर लाईट बल्ब पडली, यावेळी तो खुर्चीवरून उठण्याचा प्रयत्न करत होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.