भारतीय संघाची युवा सलामीवीर शफाली वर्माने (Shafali Verma) अल्पवाधीत क्रिकेटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केलीय. रोहतकच्या (Rohtak girl) सुनार गल्लीत आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या मुलांसोबत क्रिकेट खेळणे आणि दोन तास डम्बेल्सची कसरत करुन स्वत:ला तयार करुन 17 वर्षांच्या या मुलीनं महिला क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केलाय. आयसीसीच्या टी-20 क्रमवारीत टॉपला पोहचून तिने आपल्यातील धमक दाखवून दिली. त्यानंतर आता ती इंग्लंड (England) आणि ऑस्ट्रेलियातील (Australia) लोकप्रिय लिगमध्ये खेळताना दिसणार आहे. कोणत्याही प्रकारचे प्रोफेशनल ट्रेनिंग न घेता स्वत:च्या मेहनतीच्या जोरावर रोहतकच्या गल्लीतून सुरु झालेला तिचा प्रवास ऑस्ट्रेलिनय बिग बॅश लिगच्या मैदानापर्यंत पोहचलाय. फोटोच्या माध्यमातून नजर टाकूयात भरारी घेण्याची प्रेरणा देणाऱ्या शफालीबद्दल....
17 वर्षीय शफाली वर्मा द हंड्रेड स्पर्धेत बर्मिंघम फिनिक्स स्पर्धेत न्यूझीलंडच्या नावाजलेल्या सोफी डिव्हाइनची रिप्लेसमेंट म्हणून खेळणार आहे.
कोणतेही टेन्शन न घेता चांगली खेळी करुन देशासह वडिलांना अभिमान वाटेल, असे काम करायचे आहे, असा विचार शफाली करते.
महिला टी-20 वर्ल्ड कपमधील तिची लक्षवेधी कामगिरी पाहून इंग्लंडचा नासीर हुसेन आणि कॅरेबियन दिग्गज इयान बिशप देखील प्रभावित झाले होते. महिला क्रिकेटमधील नव्या स्टारची झलक शफालीमध्ये पाहायला मिळते, असे या दिग्गजांनी म्हटले होते.
यंदाच्या हंगामात ती दोनवेळा चॅम्पियन राहिलेल्या सिडनी सिक्सर्सकडून ऑस्ट्रेलियन बिग बॅश लिगच्या मैदानात उतरणार आहे.
भारतीय टी-20 संघाची कर्णधार हरमनप्रित कौर, स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि दीप्ति शर्मा यांच्यानंतर परदेशी लिगमध्ये खेळणारी ती पाचवी भारतीय महिला क्रिकेटर आहे.
17 वर्षीय शफाली वर्मा द हंड्रेड स्पर्धेत बर्मिंघम फिनिक्स स्पर्धेत न्यूझीलंडच्या नावाजलेल्या सोफी डिव्हाइनची रिप्लेसमेंट म्हणून खेळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.