T20 World Cup : पहिल्या उपांत्य फेरीत आज पाकिस्तान आणि न्यूझीलंड आमने-सामने येणार आहेत. सिडनी येथे होणाऱ्या या सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत, तर एकीकडे पाकिस्तानने मोठ्या मुश्किलीने उपांत्य फेरी गाठली आहे. दुसरीकडे न्यूझीलंड या विश्वचषकात चांगली कामगिरी करत आहे. ही उपांत्य फेरीची लढत अतिशय रंजक होणार आहे. या सामन्यावर भारताच्या चाहत्यांचीही पूर्ण नजर असेल, कारण टीम इंडियाने आपल्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडला हरवले तर पाकिस्तान की न्यूझीलंड यातील विजय संघाबरोबर फायनल खेळते. मात्र भारतीय चाहते पाकिस्तानच्या विजयासाठी करतायत प्रार्थना करत आहे. काय आहे कारण इतिहास.
पाकिस्तान-न्यूझीलंडचे संघ आज आमनेसामने येणार आहे. न्यूझीलंड संघाने जर विजय मिळवला भारतीयांसाठी कुठेतरी अडचण निर्माण होईल. आयसीसी इव्हेंटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारताचा विक्रम चांगला राहीला नाही. येथे प्रत्येक वेळी टीम इंडियाचा पराभव झाला. उदाहरणार्थ काय झालं तर न्यूझीलंडने 2019 च्या वनडे वर्ल्ड कप सेमीफायनल आणि 2021 च्या टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये भारताचा पराभव केला आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाच्या चाहत्यांना असे वाटते की, जर फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध सामना होण्याऐवजी पाकिस्तान बरं झालेला कधी पण चांगलं. त्यामुळे चाहते पाकिस्तानच्या विजयाची प्रार्थना करत आहे.
सध्याच्या टी-20 विश्वचषकातील फॉर्मबद्दल बोलायचे झाल्यास, न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली होती, परंतु पाकिस्तानने सुपर-12 चा टप्पा चांगल्या प्रकारे संपवला. पाकिस्तानने या स्पर्धेत पाच सामने खेळले असून, त्यात दोन पराभूत आणि तीन जिंकले आहेत. पाकिस्तानने गेल्या तीन सामन्यात नेदरलँड, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशचा पराभव केला. त्याच बरोबर न्यूझीलंडने 3 सामने जिंकले आहेत, एक हरला आहे तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. न्यूझीलंडने शेवटच्या 3 पैकी 2 सामने जिंकले. त्यामुळे न्यूझीलंडचे पारडे जरा जड दिसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.