IND vs NZ VIDEO : वर्ल्डकप 2023 च्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील धरमशालावर रंगलेल्या सामन्यात मोहम्मद शामीची गोलंदाजी आणि विराट कोहलीच्या फलंदाजीसोबतच टीम इंडियाच्या क्षेत्ररक्षणाची देखील भरपूर चर्चा झाली.
यंदाच्या वर्ल्डकपमध्ये भारताचा क्षेत्ररक्षणाचा दर्जा हा इतर संघांपेक्षा फारच वरचा राहिला आहे. मात्र न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात श्रेयस अय्यरने स्क्वेअर लेगला घेतलेल्या भन्नाट झेलनंतर भारताची क्षेत्ररक्षणातील कामगिरी आश्चर्यकारकरित्या खालावली.
रविंद्र जडेजा, केएल राहुल, जसप्रीत बुमराहने झेल सोडले. मात्र टी दिलीप हे बाऊड्री लाईवर आले अन् भारताने आपले क्षेत्ररक्षण उंचावण्यास सुरूवात केली. विराट कोहली, मोहम्मद सिराज आणि शुभमन गिलने चांगले क्षेत्ररक्षण करत गोलंदाजांना उत्तम साथ दिली.
यानंतर परंपरेनुसार क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांनी अनोख्या पद्धतीने आजच्या सामन्यातील उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची घोषणा केली. ड्रेसिंग रूमध्ये बसलेल्या संघासमोर आजच्या सामन्यात क्षेत्ररक्षणावेळी काय काय झालं हे टी दिलीप यांनी सांगितलं.
यानंतर त्यांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोण ठरला हे सांगण्यासाठी सर्वांना मैदानावर जाण्यास सांगितले यानंतर स्पायडी कॅम उत्कृष्ट खेळाडूचं नाव घेऊन आकाशातून मैदनावर अवतरला. यावेळी उत्साही टीम इंडियाच्या खेळाडूंनी एकच गलका केला होता. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार हा श्रेयस अय्यरला मिळाला.
अय्यरने ज्यावेळी हा झेल घेतला त्यावेळी त्याने टी दिलीप यांच्याकडे पाहून आपल्यालाच हा पुरस्कार मिळणार असल्याचा इशारा देखील केला होता. बीसीसीआयने याचा व्हिडिओ आपल्या वेबसाईटवर शेअर केला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.