Jwala Gutta and Sandeep Singh Sakal
क्रीडा

भारतीय हॉकीची योग्य दिशेने वाटचाल; संदीप सिंग

टोकियोत भारतीय संघाने जे यश मिळविले ते सहजासहजी मिळविलेले नाही. पूर्वी शेवटच्या काही मिनिटांत कच घात होता. टोकियोत मात्र, वेगळे चित्र पाहायला मिळाले.

सकाळ वृत्तसेवा

टोकियोत भारतीय संघाने जे यश मिळविले ते सहजासहजी मिळविलेले नाही. पूर्वी शेवटच्या काही मिनिटांत कच घात होता. टोकियोत मात्र, वेगळे चित्र पाहायला मिळाले.

नागपूर - टोकियो ऑलिंपिकमध्ये (Tokio Olympic) पुरुष संघाने मिळविलेले ब्राँझपदक, महिलांना मिळालेले चौथे स्थान, ज्युनिअर संघाला जागतिक स्पर्धेत (Global Competition) मिळालेले चौथे स्थान आणि सध्या सुरू असलेल्या आशियाई चॅम्पियन्स करंडक (Asia Champion Karandak) स्पर्धेतील वाटचाल पाहता आणि २०२४ च्या पॅरिस ऑलिंपिकचा विचार करता भारतीय हॉकीची (Indian Hockey) योग्य दिशेने वाटचाल सुरू आहे, असे प्रतिपादन भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार संदीप सिंग (Sandeep Singh) व हरियानाचे क्रीडा मंत्री संदीप सिंग यांनी केले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या चौथ्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या तारखेची घोषणा करण्याच्या कार्यक्रमासाठी आले असता ते बोलत होते. ते म्हणाले, ऑलिंपिकनंतर प्रत्येक प्रमुख संघात बदल होतो. तसाच बदल भारतीय संघातही अपेक्षीत आहे. पॅरिससाठी सध्या जवळ-जवळ अडीच वर्षाचा कालावधी आहे. ऑलिंपिकसारख्या स्पर्धांत खेळताना अनुभवासोबत दमदार युवा खेळाडूंचीही गरज लागते. सध्याच्या ज्युनिअर संघात असे अनेक खेळाडू आहेत. जे पुढील काही वर्ष भारतीय संघासाठी खेळू शकतील, त्यामुळे एखादा-दुसरा निकाल आपल्या विरुद्ध गेला तर फारसे निराश होण्याची गरज नाही. भविष्याचा विचार करता योग्य वाटचाल सुरू आहे.

टोकियोत भारतीय संघाने जे यश मिळविले ते सहजासहजी मिळविलेले नाही. पूर्वी शेवटच्या काही मिनिटांत कच घात होता. टोकियोत मात्र, वेगळे चित्र पाहायला मिळाले. शारीरिक तंदुरुस्ती सोबत मानसिकतेत झालेला बदल याचे कारण आहे आणि हेच भारतीय हॉकीच्या यशाचे गमक होय, असे मला वाटते, असे उत्तम ड्रॅगफ्लिकर असलेले संदीप सिंग म्हणाले. भारताकडे सध्या अनेक ड्रॅगफ्लिकर असे आहेत, जे उत्तम बचावपटूही आहेत. त्यामुळे संघ केवळ एकावर अवलंबून नाही, असेही त्यांनी सांगितले.

लागोपाठ दोन स्पर्धा अडचणीच्या

२०२२ मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि आशियाई क्रीडा स्पर्धा यात फार कमी कालावधी आहे. याबाबत ते म्हणाले, सलग दोन प्रमुख स्पर्धांत खेळताना खेळाडूंना ‘पीक'वर येताना आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. इतक्या कमी वेळात ‘पीक' वर येऊ शकत नाही. त्यामुळे विविध महासंघ, आयोजक यांनी एकत्र येऊन यात सुवर्णमध्य काढावा, अशी माझी सूचना आहे, असे ते म्हणाले.

हरियानाप्रमाणे नोकरी द्यावी

काही वर्षांपूर्वीपर्यंत हरियानातही खेळाडूंना नोकरीसाठी बरीच पायपीट करावी लागत होती. मात्र, २०१९ पासून आउटस्टँडिंग स्पोर्ट्‍सपर्सन पॉलिसी आम्ही लागू केली. यानुसार जसे शैक्षणीक पात्रतेच्या आधारावर एखाद्याला नोकरी मिळते. त्याचबरोबर खेळाडूची कामगिरी शैक्षणीक पात्रता समजून त्याला थेट नोकरी देण्यात येते. खेळत असेपर्यंत त्या खेळाडूला कार्यालयात न येण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धा, राष्ट्रकुल, आशियाई, ऑलिंपिक पदक विजेत्यांना स्पर्धेपूर्वी आणि स्पर्धेनंतर ताबडतोब आर्थिक मदत देण्यात येते. अशी पॉलिसी महाराष्ट्राने राबवली तर येथूनही अनेक पदकविजेते खेळाडू तयार होतील, असे त्यांनी सांगितले.

‘गोरे अम्पायर'

दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि त्यानंतर विश्वकरंडक स्पर्धेतील सामन्यात पाकिस्तानविरुद्ध केलेले गोल कायम स्मरणात आहे. त्यांच्याविरुद्ध मी सर्वाधिक गोल केले आहे. पाकिस्तानविरुद्ध खेळणे नेहमीच आवडायचे. एकतर त्यांच्याविरुद्ध खेळताना जिंकण्याची खुमखुमी राहते. दुसरे म्हणजे या दोन संघात सामना होत असताना ‘गोरे अम्पायर' राहतात. त्यामुळे असे सांगत बाकी तुम्ही समजू शकता असे हसत-हसत वाक्य पूर्ण केले.

खासदार क्रीडा महोत्सवाचा अभ्यास करणार

खासदार क्रीडा महोत्सव हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून यापूर्वीच्या तीन स्पर्धांच्या फाईल्स मी घेऊन त्याचा अभ्यास करणार आहे. अशा प्रकारचा महोत्सव हरियानात सुरू करता येईल काय

याविषयी निश्चित विचार करेल. हरियाना सरकारसोबत करार करून खेळासाठी काही करता येईल का त्याविषयी विचार करावा असा प्रस्ताव मी नितीन गडकरी यांना देणार आहे, असेही संदीप सिंग म्हणाले.

भारतीय बॅडमिंटनमध्ये आहे पोकळी - ज्वाला

सध्या सुरू असलेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय पुरुषांनी एकेरीत दोन पदके निश्चित केली असली तरी पुरुष दुहेरी, महिला दुहेरी, मिश्र दुहेरीत आपल्याकडे जागतिक पातळीवर टिकू शकतील असे खेळाडू कुठे आहेत. त्यामुळे जागतिक पातळीचा एकंदरीत विचार करता सिंधू, श्रीकांत, लक्ष्य आणि आणखी एक-दोन नावे सोडल्यास खाली भारतीय बॅडमिंटनमध्ये एकप्रकारची पोकळीच आहे, असे परखड मत जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत अश्विनी पोनप्पासोबत महिला दुहेरीचे ब्राँझपदक जिंकणाऱ्या ज्वाला गुट्टाने व्यक्त केले. संदीप सिंगसोबत ती सुद्धा खासदार क्रीडा महोत्सवाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होती. अजूनही आपण फक्त एकेरीवरच लक्ष केंद्रित करीत आहो. सात्त्विक रेड्डी आणि चिराग शेट्टीला दुखापत झाल्यानंतर जागतिक स्पर्धेत खेळू शकेल अशी त्यांच्या तोडीची जोडी आपल्याकडे नाही, ही शोकांतिका आहे. सध्या अनेक खेळाडू हे खासगी अकादमीतून येत आहे, यावर भाष्य करताना ती म्हणाली, यात चुक काहीच नाही. मात्र, सरकारच्या सहकार्याने, मदतीने खेळाडू घडविले तर कुणाचीही मक्तेदारी (गोपीचंद यांचे नाव न घेता) राहणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT