India vs Belgium Hockey : ऑलंपिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाला बेल्जियमकडून पराभवाचा धक्का बसला. चार क्वार्टरपैकी पहिल्या तीनमध्ये भारतीय संघाने वर्चस्व गाजवलं होतं. मात्र, अखेरच्या क्वार्टरमध्ये बेल्जियमने खेळ उंचावत भारतीय संघाचा पराभव केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्व:त या सामन्याचा आनंद घेत होते. हॉकी संघाच्या पराभवनंतर मोदी यांनी ट्विट करत मनोबल वाढवलं आहे. पराभव आणि विजय हे जीवनाचाच भाग आहे. तुम्ही सर्वश्रेष्ठ खेळी केली, अशी कौतुकाची थापही मोदी यांनी संघावर टाकली.
मोदी यांनी काय केलं ट्विट?
पराभव आणि विजय हा जीवनाचाच भाग आहे. टोक्यो 2020 मध्ये आपल्या पुरुष हॉकी संघाने आपली सर्वश्रेष्ठ खेळी केली. हेच आच्यासाठी महत्वाचं आहे. संघाला पुढचा सामना आणि त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा. भारताला आपल्या खेळाडूंवर गर्व आहे.
टोक्यो ऑलिंपिक स्पर्धेत उपांत्य सामन्यात भारतीय पुरुष हॉकी संघाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. रोमांचक सामन्यात बेल्जियम संघाने भारतीय संघाचा 2-5 च्या फरकाने पराभव केला आहे. या पराभवासह भारतीय संघाचं गोल्ड जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. पण कांस्य पदकाची आशा अद्याप कायम आहे. ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी यांच्यातील पराभूत संघासोबत भारतीय संघ कांस्यपदाकासाठी लढणार आहे. चार क्वार्टरमध्ये बेल्जियमला तब्बल 13 पॅनेल्टी शूट आऊट मिळाले. बेल्जियमने भारतीय संघावर दबाव करण्याचा प्रयत्न केला. बेल्जियमच्या आक्रमणाला भारतीय संघाने सडेतोड उत्तर दिले. पहिल्या तीन क्वार्टरमध्ये भारतीय संघाने बेल्जियमवर दबाव निर्माण केला होता. मात्र, अखेरच्या क्वार्टरमध्ये बेल्जियमने तीन गोल करत भारताच्या सुवर्ण विजयाचे स्वप्न धुळीस मिळवलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.