IND vs BAN  esakal
क्रीडा

IND vs BAN : टीम ऋतुराजची रूपेरी कामगिरी! आता सुवर्ण पदकासाठी पाकिस्तानसोबत होणार सामना?

अनिरुद्ध संकपाळ

IND vs BAN : भारतीय पुरूष क्रिकेट संघाने एशियन गेम्सच्या सेमी फायनल सामन्यात ऋतुराजच्या संघाने बांगलादेशचा 9 विकेट्स राखून पारभव केला. बांगलादेशने ठेवलेले 97 धावांचे आव्हान भारताने 9.2 षटकात एका फलंदाजाच्या मोबदल्यातच पार केले. भारताकडून तिलक वर्माने 55 धावांची अर्धशतकी तर ऋतुराजने 40 धावांची नाबाद खेळी केली.

भारतीय संघ आता उद्या (दि. 7 ऑक्टोबर) सुवर्ण पदकाचा सामना खेळणार आहे. आज हांगझू येथे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात दुसरा सेमी फायनल सामना होणार आहे. जर पाकिस्तानने हा सामना जिंकला तर ऐतिहासिक असा भारत - पाकिस्तान सामना होणार आहे.

भारताने नाणेफेक जिंकून बांगलादेशला 96 धावात रोखले होते. त्यानंतर हे माफक आव्हान पार करताना भारताचा गेल्या सामन्यातील शतकवीर यशस्वी जैसवाल शुन्यावर बाद झाला. मात्र त्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि तिलक वर्मा यांनी आक्रमक फलंदाजी करत बांगलादेशला डोके वर काढण्याची संधी दिली नाही.

ऋतुराज आणि तिलकने जवळपास 250 च्या स्ट्राईक रेटने धावा करण्यासा सुरूवात केली होती. ऋतुराजने 26 चेंडूत नाबाद 40 तर तिलक वर्माने 26 चेंडूत नाबाद 55 धावा ठोकत सामना 9.2 षटकातच संपवला. ऋतुराजने 4 चौकार आणि 3 षटकार मारले. तर तिलक वर्मा 6 षटकार आणि 2 चौकार मारले.

एशियन गेम्समध्ये आज भारतीय महिला आर्चर संघाने देखील कांस्य पदक जिंकले. भारताच्या अंकिता भाकत, सिमरनजीत आणि भजन कौरने व्हिएतनामच्या संघाचा पराभव केला. भारताने एशियन गेम्समध्ये आतापर्यंत 87 पदके जिंकली आहेत. ही भारताची एशियन गेम्समधील सर्वोत्तम कामगिरी आहे. यात 21 सुवर्ण 32 रौप्य तर 34 कांस्य पदक जिंकली आहे. भारताचे यंदाच्या एशियन गेम्समध्ये 100 पदके जिंकण्याचे ध्येय ठेवले आहे. अजून स्पर्धा संपायला दोन दिवस असल्याने भारताचे हे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Vidhansabha: गणपत गायकवाडांनी ज्यांच्यावर गोळ्या झाडल्या त्या महेश गायकवाडांची शिवसेनेतून हकालपट्टी

पुन्हा trump सरकार! कमला हॅरिस यांचा पराभव करत पुन्हा बनणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, बहुमताचा आकडा केला पार

Hot Water Side Effects :  आरोग्यासाठी चांगलं असलं तरी अशा लोकांनी कधीच पिऊ नये गरम पाणी, त्रास अधिक वाढेल

Devendra Fadnavis: राहुल गांधींच्या हातातील संविधान 'लाल' का? देवेंद्र फडणवीसांनी का घेतली शंका?

Maharashtra Vidhansabha: विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचा 'कलरकोड' प्लॅन, जाणून घ्या आतल्या गोटातील बातमी

SCROLL FOR NEXT