Murli Vijay Retirement ESAKAL
क्रीडा

Murali Vijay : घरातून पळून गेलेला मुरली कसा झाला भारताचा सलामीवीर?

अनिरुद्ध संकपाळ

Murli Vijay Retirement : भारताचा सलामीवीर मुरली विजयने अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला. 38 वर्षाचा मुरली विजय हा भारताचा कसोटी क्रिकेटमधील एक सर्वात चांगला सलामीवीर म्हणून ओळखला जात होता. त्याने 61 कसोटी सामन्यांच्या कारकिर्दित 12 शतके ठोकली होती. मुरली विजयचे बालपण हे एका फिल्मी कहानीपेक्षा कमी नाही.

मुरली विजय हा तमिळनाडूच्या एका परंपरिक, अभ्यासालाच प्राधान्य देणाऱ्या घरात जन्माला. मात्र तुटकपणे वागणारा मुरली विजय बोर्डाच्या परिक्षेत अपेक्षेप्रमाणे मार्क्स मिळवू शकला नव्हता. घरच्यांच्या अपेक्षांवर खरे उतरू शकला नसलेला मुरली विजय हा घरातून पळून गेला. तो एका स्नूकर क्लबमध्ये काम करू लागला.

मुरली विजयची फिल्मी वाटणारी ही कहाणी तो 17 वर्षांचा असताना बदलून केली. मुरली विजय 17 व्या वर्षी कॉलेज स्तरावरील क्रिकेट स्पर्धांमध्ये चमकत होता. त्याचवेळी भारताचे माजी गोलंदाज प्रशिक्षक भारत अरूण यांच्या नजरेत आला. त्यानंतर मुरली तामिळनाडूकडून ज्युनियर स्तरावर नंतर रणजी ट्रॉफी खेळू लागला.

मुरली विजयने अभिनव मुकूंदसोबत 462 धावांची विक्रमी भागीदारी रचली. तो वर्ल्ड रेकॉर्ड पासून अवघ्या 2 धावा दूर राहिला. मात्र या पार्टनशिपने मुरली विजयसाठी भारतीय संघाची दारे उघडून दिली.

मुरली विजयची 2008 च्या ऑस्ट्रेलिया भारत कसोटी मालिका बॉर्डर - गावसकर ट्रॉफीसाठी निवड झाली. त्याने आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीने सर्वांच्याच मनात घर केले. त्यानंतर तो भारतीय कसोटी संघातील एक महत्वाचा फलंदाज झाला.

मुरली विजयने जरी कसोटी क्रिकेटपटू म्हणून ओळख निर्माण केली असली तरी त्याने आयपीएलचे मैदान देखील गाजवले आहे. त्याने 106 आयपीएल सामन्यात 2619 धावा केल्या असून त्यात 2 शतकी तर 13 अर्धशतकी खेळींचा देखील समावेश होता.

(Sports Latest News)

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT