Indian Shooter Pushpender Kumar Injured : राष्ट्रीय स्तरावरील नेमबाज पुष्पेंदरकुमार याच्या डाव्या अंगठ्यावर आघात झाला. नवी दिल्लीतील कर्णी सिंग शूटिंग रेंजवर १० मीटर एअर पिस्तूलमध्ये सिलिंडरच्या साह्याने गॅस भरत असताना स्फोट झाला आणि त्यामध्ये पुष्पेंदरकुमारवर डावा अंगठा गमावण्याची आपत्ती ओढवली. आता त्याला भारतीय सैन दलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुष्पेंदर इंडियन एअर फोर्स (आयएएफ) टीमचा वरिष्ठ अधिकारी आहे.
पुष्पेंदर राष्ट्रीय स्पर्धेसाठी नवी दिल्लीतील शूटिंग रेंजवर सराव करीत होता. आपल्या पिस्तूलमध्ये सिलिंडरच्या साह्याने गॅस भरत असताना ही घटना घडली. एका राष्ट्रीय प्रशिक्षकांकडून ही माहिती देण्यात आली. दरम्यान, पुष्पेंदरच्या आईचे १५ ते २० दिवसांपूर्वी निधन झाले होते. पुष्पेंदर हा उत्तर प्रदेशमधील बागपत जिल्ह्यातील नेमबाज आहे. कर्णी सिंग शूटिंग रेंजमध्येच तो सराव करतो. या घटनेनंतर आता राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेमध्ये त्याला सहभागी होता येणार नाही.
दरम्यान, एका प्रशिक्षकांकडून सांगण्यात आले की, पुष्पेंदर हा अव्वल दर्जाचा नेमबाज आहे. तो २८ ते ३० वर्षांचा असून त्याच्या शरीरावर शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे. पिस्तूलमधील सिलिंडरमध्ये कोणतीही समस्या निर्माण झाल्यास त्याबाबत आपल्याला सूचना मिळते. जास्त प्रमाणात गॅस भरल्यासही स्फोट घडून येतो, असे त्यांचे म्हणणे आहे.
सिलिंडर बदलायला हवा
कर्णी सिंग शूटिंग रेंजमधील एका प्रशिक्षकांकडून याप्रसंगी स्पष्ट करण्यात आले की, एअर पिस्तूल व एअर रायफल या दोन्ही प्रकरांमध्ये सहभागी होत असलेल्या नेमबाजांनी गनमधील सिलिंडर हे दर दहा वर्षांनंतर बदलायला हवे किंवा पिस्तूल-गन यांची निर्मिती करणाऱ्यांकडून जे नियम सांगण्यात आले आहेत, त्याचे पालन करायला हवे. सिलिंडर बदलण्याची वेळ निघून गेल्यास दुर्घटना घडू शकते. पुष्पेंदरसोबत जी घटना घडली आहे, ती नेमकी कशामुळे घडली आहे, हे मला सांगता येणार नाही,
दोन ते तीन दिवसांत डिस्चार्ज
आंतरराष्ट्रीय रायफल नेमबाज रविकुमार सध्या पुष्पेंदर याच्यासोबत रुग्णालयात आहे. तसेच शस्त्रक्रियेनंतर पुष्पेंदर ९० ते ९५ टक्के तंदुरुस्त होईल, अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे. रविकुमार याप्रसंगी म्हणाला, दोन ते तीन दिवसांत त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकेल.
प्रक्रिया अशाप्रकारे होते
एअर पिस्तूल व एअर रायफल यांच्या बॅरेलच्या खाली छोटा गॅस सिलिंडर असतो. जेव्हा नेमबाज ट्रिगर दाबतो, तेव्हा सिलिंडरची गॅस एअर गनच्या आतमध्ये हातोड्याप्रमाणे टक्कर देते. त्यामुळे गोळी बाहेर पडते. एअर पिस्तूलमध्ये एका निश्चित शॉटच्या संख्येनंतर कॉम्प्रेसर किंवा पोर्टेबलच्या साह्याने सिलिंडर भरावा लागतो.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.