Apurvi Chandela  Sakal
क्रीडा

पोरीनं नाद केला, पण वाया नाही गेला!

सुशांत जाधव

आपल्या आजूबाजूला असलेला प्रत्येकी व्यक्ती काही ना काही स्वप्न मनात बाळगून जगत असतो. काहीजण एकच ध्यास घेऊन एका ट्रॅकवर चालत राहतात. तर काही जण मोक्याच्या क्षणी ट्रॅक बदलून अशक्यप्राय गोष्टी यशस्वीरित्या साध्य करुन दाखवतात. 'नाद' हा शब्द तसा बऱ्याचदा नकारार्थी वापरला जातो. पण काहींच्यामध्ये त्याचा अर्थ बदलण्याची ताकत असते. ज्यावेळी एखादा माणूस ध्येयानं झपाटलेला असतो आणि तो ते अशक्यप्राय वाटणारे ध्येय साध्य करुन दाखवतो तेव्हा त्याचा नाद करायच्या भानगडीत कोणही पडत नाही. नकारार्थी शब्द सकारात्मक रुप धारण करतो. सध्याच्या घडीला पोरगा पोरीच्या नादाला लागतो. पोरगीही पोराच्या नादाला लागते. कुणी कुणाचा नाद करावा हा तसा ज्याचा त्याचा प्रश्न पण यामागं ध्येय एकच असावं ते म्हणजे परत आपला कुणी नाद केला नाही पाहिजे. आजचा विषय अशाच नादाबद्दल.... (Indian Shooting player Apurvi Chandela Birthdy)

राजस्थानच्या जयपूरमधील (Jaipur, Rajasthan, India ) चंडेला राजपूत कुटुंबियांच्या घरी 4 जानेवारी 1993 ला एका मुलीनं जन्म घेतला. अपूर्वी (Apurvi Chandela ) अंस तिचं नाव. आई बास्केटबॉल खेळाडू असल्यामुळे खेळाचा वारसा तिला जन्मजातच लाभला होता. तिला खेळाची आवड होती पण ती मोठी होत होती ती क्रीडा क्षेत्रात पत्रकारिता करण्याचं स्वप्न उराशी बाळगून. पण 2008 ला बिजींगमध्ये भारतीय पठ्यानं देशासाठी एक सुवर्णमयी इतिहास लिहिला. या क्षणानं अपूर्वीच्या स्वप्नाला कलाटणीच दिली. लेखणी सोडून तिने रायफल हाती घेण्याचा निश्चय केला आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळतं हे तिने दाखवूनही दिले.

अभिनव बिंद्रानं (Abhinav Bindra) 2008 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत ऑलिम्पिकमध्ये 10 m air rifle क्रीडा प्रकारात गोल्डन निशाणा साधला. हा क्षण तमाम भारतीयांना एक नवी ऊर्जा देणारा होता. ऑलिम्पिकच्या इतिहासात भारताला त्याने पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले होते. देश या इतिहासाचा साक्षीदार झाला त्यावेळी अपूर्वी चंडेला अवघ्या 15 वर्षांची होती. तिनेही बिंद्राच्या पावलावर पाउल टाकायाचा निश्चय केला. आणि अपूर्वीनं रायफल हातात घेतली. कुटुंबियांची लाभलेली साथ आणि आपल्या स्वप्नावर लक्षकेंद्रीत करुन अपूर्वी भारताची स्टार नेमबाज बनली.

2012 मध्ये अपूर्वीनं नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल (10m air rifle) प्रकारात सोनेरी कामगिरी केली. इथून तिचा जो काही धडका सुरु झाला तो कौतुकास्पद होता. आतापर्यंत 10 वेळा तिने SSF World Cup स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केले. यात सात वेळा पदकी निशाणा साधला. यात तीन सुवर्ण तर तीन रौप्य आणि एका कांस्य पदकाचा समावेश आहे. या लक्षवेधी कामगिरीमुळे भारत सरकारने तिला अर्जुन पुरस्कारानेही सन्मानित केले. अपूर्वी चेंडालाने 2016 आणि 2021 मध्ये पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठीही पात्र ठरली होती.

सुशांत जाधव

Email - sushant.jadhav@esakal.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT